महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन…
पैसे मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार....

वेगवान नाशिक / मारुती जगधाने
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन
नांदगाव दि, 8 एप्रिल — जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत या मार्केटला कांदा विक्रीसाठी आणू नये अशी भूमिका येथे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी घेतले असून याबाबत शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आंदोलन करत आपली भूमिका उपस्थित समोर मांडली मात्र याबाबत उपस्थितांकडून कुठलाही दुजा दुजारा मिळालेला नाही परंतु पैसे मिळावे या भूमिकेसाठी शेतकरी ठाम असल्याचे या बोलण्यातून दिसून येते. देवळा तालुक्यातील खारीपाडा मार्केटमध्ये या शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे.
*नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणा येथील खारी फाट्यावरील रामेश्वर खासगी मार्केटमधील या व्हिडिओमध्ये एकीकडे आपल्या कांदा विक्रीचे पैसे अडकलेले शेतकरी आपले पैसे मिळावेत म्हणून जोरजोरात घोषणा देत आहेत आणि पाठीमागे याच मार्केटमध्ये कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरची मोठी रांग दिसत आहे*
*जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाही तोपर्यंत इतर शेतकऱ्यांनी या मार्केटला कांदा विक्रीसाठी घेऊन येऊ नये त्यामुळे बाजार समिती वठणीवर येईल
*शेतकऱ्यांनी आपला कांदा व इतर शेतमाल रोखीनेच सरकारी मार्केटमध्ये विकावा*
*-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.*
