शेती

कृषिमंत्री कोकाटे शेतकऱ्यांचे ” कैवारी ” आहे का ” वैरी ” … !

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिलगीर व्यक्त करुन मागीतली माफी ---


वेगवान नाशिक   /   भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर  : दि , 6 एप्रिल — कर्ज माफ केले तर शेतकरी त्या पैशातून लग्न लावतात. त्या पैशाचा योग्य वापर केला जात नाही. कर्ज माफी हा माझा विषय नाही… !       कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे धक्कादायक विधान ,,, त्यांच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांनी या संदर्भात शेतकऱ्यांबाबत केलेलं विधान मागे घेतले असून शेतकर्यांची दिलगीर व्यक्त करून माफी मागितली आहे परंतु फक्त माफी मागुन चालणार नाही तर नैतिकता आदर राखून त्यांनी राजीनामा द्यावा नाही तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा सूर महाराष्ट्रभर सुरू आहे.

”    साहेब … तुम्हाला आमच्या मुलामुलींची लग्ने व साखरपुडे दिसतात परंतु आमच्या कष्टाने व घामाने भिजलेली शरीर का दिसत नाही. आमचं असं झालं सरकारने तारले तर दैवाचा घाला बसतो.अवकळी. वादळ.नपिक पाऊस.गारपीट. तर कधी दुष्काळ यामुळे शेती वर किती मोठा परिणाम होत असतो तेही वर्षे नु वर्षे हे भोगतोय माझा शेतकरी… , साहेब … तुम्हाला आमच्या ह्या वेदना का नाही दिसत.अनेक वेळा टोमॅटो रस्त्यावर फेकण्यात आले आहे व हताश होऊन जड पावलांनी अन् रिकाम्याच हाताने घरी येऊन पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरुवात करणारा माझा शेतकरी का बरं आठवला नाही मंत्री कोकाटे साहेब… पिढ्यानपिढ्या खोलवर गेलेल्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी साहेब … तुम्ही तर मिठ चोळुन मोकळे झाले आहे.अशा असंवेदनशील वक्तव्य करून आपण काय साधले. हे तरी आम्हाला कळु द्या…

कृषिमंत्री व सिन्नर मतदार संघातील पाचव्यांदा शेतकऱ्यांच्या जिवावर आमदार झालेले माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांचे ” कैवारी ” आहे का ” वैरी ” असा संतप्त सवाल सिन्नर मतदार संघातील सर्व स्तरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. .कारण आमदार कोकाटे मंत्री झाल्यापासून कायमच शेतकऱ्यांची किल्ली उडवताना दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरीवर्ग्राच्या अस्मितेला धक्का दिला जातो आहे .त्यामुळे महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील व खुद्द कृषी मंत्री कोकाटे यांच्याच तालुक्यातून संतापाची लाट पहावयास मिळत आहे.
शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा देण्याची योजना विद्यमान सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन सुरू केली होती. पुढे या योजनेचा लाभ राजकीय दलाल .व्यापारी व उद्योजक या प्रवृत्तीचे लोकनी हस्तक्षेप करून मलिदा खाल्ला व शेतकऱ्यांच्या अज्ञान पणाचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पिक विमा चा गैरफायदा घेतला गेला आणि त्याचा दोष शेतकरी असल्याचा भास निर्माण केला गेला आहे. याची कुठलीही शहानिशा न करता  कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांचा कैवार न घेतला उलट त्यांनाच भिकारी संबोधतात. या योजनेत ” आंधळ दळतं आणि कुठे पीठ खातं ” अशी अवस्था दिसून येत आहे . कारण पिक विमा चा गैरफायदा घेतला जात असताना कृषी क्षेत्रातील संबंधित अधिकारी काय करत होते, गरजु शेतकऱ्यांना या योजनेचा तर लाभ मिळाला नाही, आजूनही एक रुपयात पिक विमा मिळालेला नाही ते आजही त्या प्रतीक्षेत आहे. त्यांना पिक विमा चा आधार देण्याऐवजी त्यांना भिकारी म्हणून हिणवले जाते हि या कृषिमंत्री यांची संस्कृती असते काय, आशा तिव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच निवडणुकी पूर्वी राज्याची विद्यमान मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी निवडणुकीला तोंडावर मतांचा जोगवा मागत शेतकऱ्यांना शब्द दिला होता  की तुम्ही आम्हाला मतं द्या आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला  शेतकरी कर्जमाफी देवु आणि त्या आत्मविश्वासावर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी भरोसा ठेवला आणि या सरकारला भरभरून मतदान केलं परंतु प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या या सरकारला शेतकऱ्यांचा विसरच पडला की काय असे एकंदरीत दिसून येत आहे.
आमदार कोकाटे मंत्री झाल्यापासून तालुक्यातील विरोधकांचा आवाज बंद झालेला दिसत आहे . याची कारणे काय आहेत . हे येणारा काळच ठरवेल परंतु सर्व स्तरातून  असे प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे याचं उत्तर वेळ आल्यावर जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. वेळ पडल्यास याचे उत्तर द्यावाच लागेल. विरोधक निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीने आक्रमक दिसत होते आता ती आक्रमकता का दिसत नाही. कुठे गेली त्यांची जनतेवर असलेली  तळमळ…. कुठे त्यांची समाजाबद्दलची अस्मिता…. कोकाटे यांचे विरोधक असलेले खासदार राजूभाऊ वाजे यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील मतदार बांधवांना वाऱ्यावर सोडत आमदार कोकाटे यांना निवडणुकीतच साथ देण्याचे बोलले जाते त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी भावनांशी व स्वाभिमानी व निष्ठावंत कार्यकर्ते या नेत्यांपासून दुरावले आहेत.कार्यकर्त्यांशी गद्दारी करून कोकाटे यांच्या खांद्याला खांदा लावून आपण आजही एकत्र दिसतं आहे . तुमचं भांडणं मिटलं परंतु आमचं काय… ?
या नेत्यांच्या राजकीय सोयीसाठी कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणात गोची झाली आहे. याची दखल कोणीच घेतांना दिसत नाही.तसेच विधानसभेच्या निवडणूक त आमदार कोकाटे यांच्या विरोधात जाऊन उदय सांगळे यांच्या विजयासाठी अनेकांनी आपल्या भुमिकेवर ठाम असल्याचे दाखवून दिले आहे. दुर्दैवाने राजकारणातील उलथापालतीमुळे सांगळे यांचा पराभव झाला व उमेदवार सांगळे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तो पराभव पोचवला आहे.परंतु विरोधक मात्र कुठल्याच गोष्टीवर बोलताना दिसत नाही व सत्ताधारी आमदार खासदारांना जाब विचारतांना दिसत नाही. ही खेदाची बाब आहे .कारण निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना काय हवं याची अचूक नाडी राज्यकर्त्यांनी हेरली असून निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यास हातखंड असलेले आजी – माजी आमदार, खासदार यांना यापुढे मात्र तालुक्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमचं मत तुम्हाला दिलं त्या बदल्यात आमचं पण मत ऐकून घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे आमचं मत ऐकून घेणार का? का उलट आम्हालाच भिकारी म्हणून हिणवले जाणार .. . पूर्वी बारा बलुतेदार खेड्यापाड्यात शेतकऱ्यांच्या आधारावर आपले जीवन जगत असत म्हणजे शेतकऱ्यांनी या समाजाला वर्षभर धान्य पुरवायची व त्या बदल्यात वर्षेभर त्यांच्याकडून ते – ते काम करून घ्यायची अशी पद्धत होती .म्हणजे द्या आणि घ्या मग आम्ही मत दिलं त्या बदल्यात तुम्हाला आम्ही आमचं मत विचारू शकत नाही का असावा नाही सर्वच शेतकरी विचारताना दिसत आहे. आम्ही शेतकरी म्हणून कृषी मंत्री या नात्याने तुमच्या कडे कर्ज माफिची मागणी केली असता..

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin
  •        कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले —
  •      शेतकरी एकदा कर्ज घेतो आणि पाच वर्ष थकवतो थकलेला कर्ज सहकार मी माफ करावे या अशेवर जगतो . ठीक आहे उद्या सरकार कर्ज माफ करेल ही परंतु या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो .किती शेतकरी आपल्या शेतात सुधारणा करतात. योजना राबवतात. नाही शेतकरी कर्जमाफ झाल्यानंतर त्या पैशाचं मुलींचे लग्न लावतात . साखरपुडा करतात. घर बांधतात .गाड्या घेतात. मजा करतात. मग शेतीचा विकास होणार कसा .व शेतकरीची सुधारणा होणार कशी.सरकारने किती वेळा कर्ज माफ केले तरी का उपयोग होईल.
    — कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

परंतु स्वतःला हुशार समजणारे व शेती क्षेत्रात अनुभव असल्याची ठामपणे सांगणारे कृषी मंत्र्यांना ही माहित नाही का कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा होतात. त्यांना रोख रुपये दिले जात नाही .मग ते लग्न गाड्या घोड्या मोज माझ्या या करण्याचा संबंध येतोच कुठे आणि लग्न कार्य  तर त्यांच्या हिमतीवर व स्वतः  जिवावर त्यात वेगळं काय आहे. सरकारने कर्ज माफ केले नाही तरी मुलामुलींची लग्ने थांबले नाही ते वेळप्रसंगी जमिनीचा एखाद्या तुकडा विकुन आपलं कार्य उरकलं आहे. डोळ्यासमोर जमीन जाते तेव्हा त्या कुटुंबातील अवस्था काय होत असेल याची कल्पना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे असायला हवी होती.पहिले या संदर्भात सखोल अभ्यास करावा मगच भाष्य करावे असा सल्ला सर्वच राजकीय विरोधकांकडून  दिला जात आहे. या प्रकरणी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.या संदर्भात मंत्री कोकाटे हे अखेर… शेतकऱ्यांपुढे झुकले असून त्यांनी दिलगीर व्यक्त करून माफी मागितली आहे.

वरील सर्व प्रतिक्रिया अनेक तालुक्यात शेकडो शेतकरी वर्ग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!