सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा येवला तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा
सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा येवला तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक /दिनांक :5 एप्रिल/ नाशिक जिल्ह्यात सह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी मिळावी,या मागणीसाठी बैलगाडी मोर्चा आंदोलन येवला कृषी उत्पन्न बाजार समिती पासून येवला तहसील पर्यंत या मोर्चाचे आयोजन केले आहे.
हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार असून या मोर्चाचे नेतृत्व छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर हे करत असून या मोर्चा प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, युवा प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग,केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ.किरण डोके, विद्यार्थी आघाडी प्रदेश संपर्कप्रमुख गिरीश आहेर,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघ,उद्योजक आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील,आयटी प्रदेश अध्यक्ष किरण बोरसे,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई सूर्यवंशी,युवक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश जाधव,युवक महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख अमोल शिंदे, कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश पाटील,कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस किरण बोरसे यांसह सर्व आघाड्यांचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख,महानगरप्रमुख सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी: येवला तालुक्यातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी, छावा क्रांतिवीर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व इतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व संघटनांनी या शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी निघणाऱ्या बैलगाडी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.ज्या शेतकऱ्यांकडे बैलगाडी आहे त्यांनी ती सोबत आणावी.
मोठमोठ्या उद्योगपतींची कर्जमाफी होते, राजकीय नेत्यांची कर्जमाफी होते… मग कष्टकरी जगाला जगवणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी का नाही?
या अन्यायाविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी सर्वांनी संघटितपणे या मोर्चात सहभागी व्हा!
असे आव्हान नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे,ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ,शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख गोरख संत,महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविता वाघ,शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर पालखेडे,येवला तालुका अध्यक्ष प्रफुल गायकवाड,नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे येवला तालुका संपर्कप्रमुख रोहिदास पवार गोरख कोटमे,विजय मोरे,संदीप पवार, सोपान लांडगे,वैभव फड,गोरख सांबारे,अभिषेक पुंड,आदित्य डोंगरे,ओंकार जाधव,आदींसह जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये