देशाचं उद्याचे भविष्य घडविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका, सेविकांची – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
देशाचं उद्याचे भविष्य घडविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका, सेविकांची - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला,दि.५ एप्रिल :- समाजातील लहान लहान बालकांवर चांगले शिक्षण, संस्कार त्यांच्या पोषणाची महत्वपूर्ण जबाबदारी या अंगणवाडी सेविकांकडे आहे. हीच मुले आपल्या देशाचे उद्याचे भविष्य असून ते घडविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी अंगणवाडी शिक्षिका व सेवकांची आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील नवनियुक्त अंगणवाडी शिक्षिका व सेविकांच्या नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकज मगर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, कृषी अधिकारी शुभम बेरड, सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, गटशिक्षण अधिकारी कुसाळकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, भगवान ठोंबरे, देविदास निकम यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक खुल्या जागेवर अंगणवाडी भरत होत्या. शिक्षणाच्या या कार्यापासून कुठलाही बालक सोयी सुविधांपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना सुमारे ३६ कोटी रुपये खर्चून जिल्ह्यातील शेकडो अंगणवाड्या इमारती बांधण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील लहान बालकांना शिक्षण मिळण्यासाठी अंगणवाडी या अतिशय महत्वाच्या आहे. याठिकाणी या बालकांना चांगल शिक्षण, संस्कार आणि पोषण देण्याची जबाबदारी शिक्षिका व सेविकांची असल्याने नव्याने शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या शिक्षिका व सेविकांनी योग्य रित्या पार पाडावी अशा सूचना त्यांनी केल्या.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये