कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या …
श्री, कोकाटे सह 25 माजी संचालकांना व 12 अधिकार्याचे चौकशीचे आदेश..

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
” नाशिक जिल्हा सह.बॅकच्या घोटाळ्या संदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सह 25 माजी संचालकांना व 12 अधिकार्याचे चौकशीचे आदेश … !
सिन्नर, दि: 23 मार्च — कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्री पदावर आरूढ झालेल्या पासून वेगवेगळ्या प्रकारच्या वादात सापडलेले श्री, कोकाटे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत त्यामुळे राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे, सिन्नर चे विद्यमान आमदार व राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली असून नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या 347 कर्ज वाटपात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून 182 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आली आहे .त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने या सर्व सभासदांना धोका दिला आहे.त्यात कोकाटे यांची महत्वाचे भुमिका आहे त्यामुळे कोकाटे हे सर्व स्तरातून किती भ्रष्टाचारी आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर झाले आहेत. नोट बंदी काळात श्री, कोकाटे यांनी सत्याचा गैरवापर करून कुठलेही नोंद न करता फक्त नोटा बदलून घेतल्यानंतर बॅक मोठ्या प्रमाणात अडचणीत आली आहेत. सर्वसामान्य समाजाची व शेतकरच्या हितासाठी स्थापन केली होती परंतु कालांतराने या बॅंकेच्या सभासदांना वार्यावर सोडून कोकाटे यांनी दबावाखाली येऊन सरकारची दिशाभूल करत अनेक वर्षे सभासदांना फसवले होते त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी निगडीत असलेल्या या बॅंकेच्या सभासदांना अनेक दिवसांपासून अडचणी वाढल्या आहेत. गावा- गावात असलेल्या एन.डी. सी. बँकेच्या शाखेत सभासद व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती परंतु राजकीय हस्तक्षेप करून या बँकांच्या संबंधित अधिकारी व संचालक मंडळाने संगनमत करून या बँकांच्या तिजोरीत अफरातफर केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अनेक शाखा बंद अवस्थेत आहे . कर्मचार्यांचे अनेक दिवसांपासून पगार प्रलंबित आहेत.तसेच सभासदांनी बॅकेत आपल्या मुलीच्या ( विवाह )लग्ला साठी तुटपुंजी का होईना आपली रक्कम या बॅकेत जमा केली होती , या संस्थेवर विश्वास होता त्याला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कडून तडा गेला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणार्या कोकाटे यांना जनता कधीच विसरू शकणार नाही हे लक्षात घेऊन तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी कोकाटे यांना दोषी ठरवून नाराजी व्यक्त केली आहे. ज्या गरीब कुटुंबातील लोकांना अजूनही घरकूल नाही त्यासाठी अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कुटुंब अजुनही उघड्यावर राहतात परंतु सत्तेचा गैरवापर करून स्वतः मात्र चार सदनिका मिळवल्या तेही खोटे कागदपत्र तयार करून चक्क शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्टाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.. एकीकडे सर्वसामान्य जनता घरं नसल्याने आपला प्रपंच उन्हात.पावसात. व थंडीत दिवस काढावे लागत आहे तर चक्क आमदार च घर नसल्याचे खोटं सांगुन चार चार घरं हाडपतात तर दुसरीकडे जनता मात्र घर मिळवण्यासाठी आटापिटा करत आहेत. यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जनता मात्र तीव्र नाराज आहेत हे मात्र नक्की..
