
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक : 18मार्च/विखरनी गाव सध्या अवैध दारू विक्री मुळे परिसरात चर्चेत आहे. गावात 24 तास उघड उघड अवैध दारू विक्री सुरु आहे. मुख्य म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या गेटवर उघड दारू विक्री होते. वारंवार ग्रामस्थांनी तक्रार करूनही अवैध दारूविक्री थांबेलली नाही. त्यामुळे गावातील महिला आक्रमक झाल्या असून सरपंच सौं ज्योती शेलार यांनी विशेष महिला ग्रामसभेचे नियोजन केले आहे.
गुरुवार दि 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय आवारात गावातील महिलांची विशेष ग्रामसभा बोलावली आहे. ग्रामसभेसाठी येवला ग्रामीण पोलिस स्टेशनं निरीक्षक मंडलिक यांना निमंत्रण दिले आहे.
विखरनी हे शेजारील 5/6 गावांच्या मध्यावंर चे व्यापारी दृष्टीने महत्वाचे गाव आहे. हिंदू मुस्लिम सह वेगवेगळ्या समाजाचे लोक गावात राहतात. अतिशय शांत गाव म्हणून गावाची ओळख असताना अवैध दारू विक्री मुळे गाव बदनाम होत असून गावातील 13/14 वर्षाचे लहान मुलं दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावातील महिलांनी आपले कुटुंब, संसार या व्यसनापासून वाचविण्यासाठी एकत्र आले आहे. गावात दारूबंद हा महिलांचा ठाम निर्णय आहे आणि यावर पोलिसांनी कार्यवाही करावी यासाठी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले असल्याचे सरपंच सौं ज्योती शेलार व ग्रामसेविका छाया ठाकरे यांनी सांगितले.
हिंदू मुस्लिम सह वेगवेगळ्या समाजाची मोठी लोकसंख्या असणारे आमचे विखरणी गाव शांत गाव म्हणून तालुक्यात परिचित आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक विकास झालेले गाव म्हणून आमच्या गावाची एक चांगली ओळख आहे. अवैध दारूविक्री मुळे गाव बदनाम होत आहे. तरुण पिढी दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. गावात दारूबंदी हा आमचा समस्त गावातील महिलांचा निर्णय आहे. दारूबंदी करणारच….
सौं ज्योती शेलार
सरपंच विखरणी

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये