राज्यातील चॅरिटी हॉस्पिटलमध्ये जिल्हानिहाय डॅश बोर्ड आणि अॅप तयार करा…, उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची विधानपरिषदेत सूचना…
उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांची विधानपरिषदेत सूचना...

मुंबई दि. 18 मार्च २०२५
राज्यातील चॅरिटी हॉस्पिटलमध्ये (धर्मदाय रूग्णालयात) तंत्रज्ञानाचा वापर करत जिल्हानिहाय डॅश बोर्ड आणि अॅप तयार केले तर कोणत्या रुग्णालयात किती जागा रिक्त आहेत याची तत्काळ रुग्णांना माहिती मिळेल अश्या सूचना उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी विधानपरिषदेत दिल्या आहेत.
चॅरिटी हॉस्पिटलमध्ये (धर्मदाय रूग्णालयात) रिक्त जागा आणि रुग्णालयातील जास्तीची बिले याबाबत आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर आमदार भाई जगताप आणि आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तर देतांना शासनाची जागा, शासनाच्या योजनेचा फायदा ज्या रुग्णालयांनी घेतला आहे.
या रुग्णालयांवरील नियंत्रणासाठी आस्थापना तयार करून कमिटी तयार केली जाईल असे आश्वासन दिले.यावेळी पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी कोविड काळात सगळ्या जिल्ह्यात समिती तयार करत डॅश बोर्ड तयार करण्यात आले होते. यामुळे सिव्हिल सर्जन यांना कोणत्या रुग्णालयात किती जागा आहेत कळत होते. याचा फायदा रुग्णांना तत्काळ दाखल करून उपचार देण्यासाठी झाला. त्या तंत्रज्ञानाचा वापर करत जिल्हानिहाय डॅश बोर्ड आणि अॅप तयार केले तर कोणत्या रुग्णालयात किती जागा रिक्त आहेत याची तत्काळ रुग्णांच्या कुटुंबियांना माहिती मिळेल अश्या सूचना केल्या.
आरोग्य मंत्र्यांना दर महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात जाणे शक्य नाही मात्र सहा महिन्यांतून एकदा जिल्हानिहाय ऑनलाइन बैठक घेतल्यास चॅरिटी हॉस्पिटलमधील रुग्णांलयातील रिक्त खाटांची माहिती मिळेल, जास्तीच्या बिलांमुळे वाढणारे तंटे थांबतील अश्या सूचनाही यावेळी उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिल्या आहेत.
