नांदगाव मतदार संघाकरता 27 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता …
पंचवीस उपकेंद्र तर दोन आरोग्य केंद्रांच्या समावेश

वेगवान नाशिक / मारुती जगधाने
” नांदगाव मतदार संघाकरिता 27 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी ”
25 उपकेंद्रे तर 2 प्राथमिक आरोग्य केंद्र —
आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश !!
➡️ पंधरावा वित्त आयोगातून निधी मंजूर.
नांदगाव , दि : 17 मार्च — नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकरिता आरोग्य सुविधा पुरविण्यात बाबत सतत प्रयत्न करत असताना ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम होण्या साठी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातून 25 आरोग्य उपकेंद्रे तसेच दोन प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जवळपास 18.45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.लवकरच कामे पूर्णत्वास जातील आणि सर्वसामान्य जनतेला अधिक चांगली आरोग्य सेवा व सुविधा मिळेल : आमदार सुहास आण्णा कांदे
ग्रामीण भागातील नागरिकांकरिता शासकीय आरोग्य सेवेचा मोठा आधार असतो या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडे उपकेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता निधी मिळावा म्हणून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी पाठपुरावा केला होता. या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 25 उपकेंद्रे व दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मोठा निधी मंजूर झालेला आहे.
यामुळे मतदार संघातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक दर्जेदार होईल, व नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
” मालेगाव तालुक्यातील गावे —
गिगाव जळगाव नि सावकारवाडी सोनज घोडेगाव चिंचगव्हाण जातपाडे येसगाव जेऊर व दहिवाळ गावांचा समावेश आहे तसेच
नांदगाव तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये बोलठाण कासारी जातेगाव परधाडी साकोरा, तळवाडे पोखरी बानगाव कोंढार मांडवड वंजारवाडी वडाळी हिसवळ खुर्द पिंपरखेड व *प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता* बोलठाण व हिसवळ गावांचा समावेश आहे
