नाशिक क्राईम

नाशिक: आमदाराच्या त्रासामुळे शीतल महाजन यांनी घेतले विषारी औषध


वेगवान नासिक/सागर मोर

आमदाराच्या त्रासामुळे कॉग्रेसच्या अध्यक्षा शीतल महाजन यांचा विषारी औषध घेऊन संपविण्याचा प्रयत्न .खाजगी रुग्णालयात उपचार सुरु अभोणा पोलिसात तक्रार दाखल!

कळवण सुरगाणा मतदार संघाच्या विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या सततच्या त्रासामुळे कॉग्रेस तालुका अध्यक्षा शीतल महाजन यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या प्रयत्न केला आहे. खाजगी रुग्नालयात उपचार सुरु आहे. अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि शीतल महाजन यांचे पती ग्रामसवेक असून त्यांना कोणत्या कोणत्या खोट्या तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्याना चौकशीसाठी पाठवत असल्यामुळे त्याची पत्नी शीतल महाजन यांना मानसिक त्रास होत असल्यामुळे टोकाचे पाऊल उचले आहे. विधानसभा निवडणुकीत शीतल महाजन यांनी आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे पती ग्रामसेवकला खोट्या तक्रारी करून अटकविण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र चौकशी पण झाल्या काहीच आढळेल नाही.मात्र आमदाराकडून त्रास हा सुरूच होता त्याच त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला आहे.आमदार नितीन पवार त्याची पत्नी जयश्री पवार यांच्या विरोधात अभोणा पोलीस तक्रार दाखल.

दरम्यान सद्या बीड जिल्हाचे गुन्हेगारीचे वातावरण झाले आहे तसेच वातावरण करण्याचा प्रयत्न कळवण मतदार संघात सुरु आहे.कळवण तालुक्यात आमदार नितीन पवार यांच्या विरोधात जनतेने कौल दिल्यामुळे गावागावातील विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे.येत्या दोन कळवण तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी जनतेने दिला आहे. दादागिरी दमबाजी आमदाराची खपवून घेणार नाही असा इशारा आदिवासी नागरिकांनी दिला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र अभोणा पोलीसानी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहे. अभोणा पोलिसांवर आमदार नितीन पवार यांनाचा दबाव असल्यामुळे गुन्हा केला जात नाही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे ..तक्रारकर्ते योगेश गायकवाड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!