वेगवान न्यूज /सागर मोर
वणी शहरातील काही भागात अवैध गुटखा मटका देशी दारू व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले आहे याला वरदहस्त कुणाचा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.वणी शहरातील अनेक ठिकाणी अवैध गुटखा मटका देशी दारू व्यावसाय बिनदिक्कत सुरू आहे.
परंतु पोलिस यंत्रणा मात्र थंडावलेली आहे.काही भागात राजरोस मटका घेण्याचे सुरू असुन या भागात पोलिस जायला घाबरतात त्यामुळे या भागात मटका सुरू आहे पुर्वी मटक्याच्या वेगळ्या चिठ्ठ्या असायच्या आता साध्या वहीच्या पानावर मटक्याचे आकडे लिहुन दिले जातात.
तसेच ठराविक मटका घेणारे तेही हायटेक झालेले मोबाईल वरच मटका घेतात.त्यामुळे संशयाचा प्रश्न येत नाही.मोबाईल मटका घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे लाखो रूपयांचा व्यावसाय सुरू आहे.काही तथाकथित नेते पुढारी यांचेच व्यावसाय असुन राजकिय वरदहस्त असल्याने पोलिस यंत्रणेला जुमानत नाही
तसेच गुटख्याच्या बाबतीत म्हणायचेच झाले तर पोलिसांना खबरी देणारेच गुटख्याची होलसेल विक्री करतात ही बाब पोलिसांना माहित असुनही पोलिस त्यांना बरोबर घेऊन फिरतात काही दुचाकी किंवा चारचाकी गाडीवर प्रेस नाव टाकुन यात गुटखा तसेच अवैध देशी दारू वितरित केले जाते.
गुटखा तर राजरोस वितरित होतो.यांच्या कडून किरकोळ गुटखा विक्री करणा-यांनी घेतला नाही तर पोलिस स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्फत छापे मारायचे असे अनेक पोलिसांचे खबरी त्यांना हे व्यावसाय करायला सुट पोलिसांनी दिली आहे.
एकीकडे कारवाई चा बडगा दाखवायचा एका बाजुने धंद्यावाल्यांशी आर्थिक हातमिळवणी करायची अवैध देशी दारू विक्री बाबत भयानक सत्य आहे लखमापूर फाटा ते करंजवण कोशिंबे या भागात मोठ्या प्रमाणात विक्री होते.प्रत्येक विक्रेत्याची याभागातील पोलिस अधिकारी व हवालदार यांची हात मिळवणी झालेली आहे.जेव्हा जेव्हा पोलिस छापे मारतात त्यावेळी फक्त दोन तीन बाॅक्स सापडतात हा अधुन मधुन छापा मारल्याचा देखावा केला जातो.
या परिसरातून रोजच्या रोज शेकडो अवैध देशी दारू बाॅक्स होलसेल विक्रेते वितरित करतात हे रोज सुरू आहे.वरिष्ठ अधिकारी या कडे दुर्लक्ष करतात.काही भागात होमगार्ड हे अवैध दारू विकतात.वणी शहरातील काही सरकारी देशीदारू विक्रेतेही मोठ्या प्रमाणात खेडोपाड्यात घरपोच माल पाठवतात ह्या बाबी पोलिस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहित असुन अर्थपुर्ण कानाडोळा करतात.पोलिस उप अधिक्षक यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
