शेती

… यांच्या लफड्याच्या प्रकरणात ” डजनच्या ” वर लोकांवर संशय ,,, !!

दोघांनी एकत्र मिळून शेवटी टोकाचं पाऊल उचलले ,,,,


वेगवान नाशिक. / मारुती जगधाने

बागलाण , दि : 14  मार्च   —  नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील चाळीस वर्षे वयाची महिला व 40 वर्षे वयाचा पुरुष या दोघांचे प्रौढांचे प्रेम संबंध होते त्यांनी वैफल्यग्रस्त झाल्याने नांदगाव चाळीसगाव लोहमार्गावर नस्तनपर येथे रेल्वे गाडीखाली आत्महत्या केली या प्रकरणांमध्ये सोळा व्यक्तींवर संशय असल्याने गुन्हा दाखल झालेला आहे तपास नांदगाव पोलीस करत आहे. घटनेने मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे.

. तथापि, अशा प्रकारच्या नातेसंबंधांमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि मानसिक आव्हानांवर चर्चा केली जाते. उदाहरणार्थ, ‘गृहशोभा’ मासिकातील काही लेखांमध्ये ब्रेकअपनंतर महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमधील तणावांवर कसे मात करावे याबद्दल सल्ले दिले आहे.

अशा नात्यांमध्ये येणाऱ्या तणावांमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे आत्महत्येसारखी गंभीर पावले उचलली जाऊ शकतात। त्यामुळे, अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि भावनिक आधार मिळवणे अत्यावश्यक आहे। यातून होणाऱ्या आत्महत्यांना ब्रेक लागू शकतात परंतु अशा प्रेम संबंधित प्रेमिकांनी टोकाची भूमिका न घेता सामंजस्य भूमिकेतून आपला जीवनाचा संसार पुढे न्यावा. परंतु या घटनेमध्ये विधवा महिलेचा संसार तो उघड्यावर पडलास व त्यासोबत दुसऱ्या तिच्यावर प्रेम करणाऱ्या विवाहित पुरुषाचा देखील संसारात उघड्यावर पडलेला आहे दोघांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

अशाच आशयाची एक घटना नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे घडली आहे या संदर्भात नांदगाव पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून वृत्तांत या घटनेमध्ये तब्बल 16 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नांदगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 108 / 25 बी एन एस कलम 108 ,351,(2)(3),३ (5 )प्रमाणे
फिर्यादी .गोविंद नवनाथ मिटके राहणार भाटगाव तालुका येवला जिल्हा नाशिक याने फिर्यादीत म्हटले की मयत उज्वला रामकृष्ण खताळ वय वर्ष 42, मयत ज्ञानेश्वर माधव पवार वय ४०वर्षे दोघे राहणार वंजारवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक
आदी सह इतर १६ संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या लोकांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं एका चिठ्ठीमध्ये व्यक्त केल्याची तशी नोंद गुन्ह्यातही झालेली आहे. सोळा संशय ित हे
सर्व राहणार वंजारवाडी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण दिनांक 11 मार्च 2025 रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेचे दरम्यान नस्तनपुर शनि देवाचे समोरील रेल्वे ट्रॅकवर कोणत्यातरी येणाऱ्या किंवा जाणाऱ्या रेल्वे गाडी समोर नस्तनपुर शनी मंदिरा देवाचे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे दिनांक बारा तीन पंचवीस रोजी सहा एकोणवीस वाजता गुन्हा दाखल आहे.वरील घटने संदर्भात वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांची बहीण उज्वला व तिचा प्रियकर ज्ञानेश्वर माधव पवार यांना त्यांच्या वंजारवाडी गावातील इसम
संशयित आरोपी यांनी प्रत्यक्ष व फोन द्वारे आत्महत्या प्रवृत्त करून वेळोवेळी शारीरिक सुखाची मागणी करून तसेच दिलेल्या मानसिक छळाला व धमक्यांना घाबरून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक बहाकर व पोलीस हवालदार मोरे करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!