सिन्नर च्या पांगरी येथील अमरधाम च्या आवारात घाणीचे साम्राज्य — !!
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईक चीं कुचंबणा ,,,

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर, दि : 12 मार्च — तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या पांगरी गावातील स्मशानभूमीची आवारातील दयनीय अवस्था असल्याचे दिसून आले आहे, सर्व गावच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील निगडीत व जिव्हाळाचा असलेल्या अमरधाम च्या आवारात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी भावनांशी खेळु नका अशी अपेक्षा ग्रामस्थ करतं आहे.याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, या संदर्भात काही दिवसांपूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार केली आहे परंतु अद्याप कोणतीही सुधारणा होत असताना दिसत नाही, तरी संबंधित विभागाने या गोष्टींची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावातील प्रतिष्ठित व्यापारी रमेश विठ्ठल पगार यांनी केली आहे ,
या संदर्भात श्री, पगार यांनी सांगितले की,पांगरी गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळी यांना विनंती आपल्या अमरधाम मध्ये अंत्यविधीसाठी गेल्यानंतर तेथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळले तरी तेथे ग्रामपंचायती ने साफसफाई करून घ्यावी व चोहोबाजूनी झाडी लावावी व अमरधामच्या गेटला कुलूप लावल्यास तेथे कोणीही घाण करणार नाही. आमच्या विनंतीचा विचार करावा ही विनंती केली आहे.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मृतदेहला अंतिम संस्कार करण्यात येते ती जागा तर स्वच्छ व शुद्ध आणि सुरक्षित नसेल तर ती एक शोकांतिका म्हणावी अशी च परिस्थिती येथे आल्यानंतर लक्षात येते . अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईक चीं कुचंबणा होते.. अंतिम संस्कार पुर्ण होवोत तोपर्यंत शेवटच्या निरोप देण्यासाठी आलेल्या नातेवाईक यांना दुर्गंधीयुक्त वातावरणाचा सामना करावा लागतो व जिव मुठीत धरून येथे बसून राहावं लागतं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. या वर सर्वांनीच जागरूक नागरिक म्हणून लक्ष देण्याची गरज आहे, या संदर्भात काही सुधारणा न झाल्यास पुढील तालुका व जिल्हा स्तरावर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
