या शेतकऱ्यांनी उन्हाळी मका पिकाचे घेतले एकरी 44 क्विंटल विक्रमी उत्पादन
हायटेक ५१०६ मका बियाणे वापरल्याने झाला फायदा...

वेगवान नाशिक. / मारूती जगधाने
बागलाण दि : 12 मार्च 2024. —-हायटेक ५१०६ या कंपनीचे उन्हाळी मका बियाणे लागवड केल्याने लक्ष्मण शिंदे राहणार ढेकू ता . नांदगाव जि.नाशिक या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एकरी 44 क्विंटल मका उत्पादन झाले आहे या संदर्भात सीड्स कंपनीच्या वतीने शिंदे यांच्या ढेकू येथील शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये सुमारे 300 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चा उमटली.
हायटेक (HITECH ५१०६) हे मका बियाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. हे बियाणे उच्च उत्पादनक्षमतेसाठी ओळखले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.
मका शेतीतील उत्पादन खर्च विविध घटकांवर अवलंबून असतो, जसे की जमिनीची तयारी, बियाण्यांची किंमत, खते, कीटकनाशके, मजुरी, सिंचन, आणि इतर शेतीसंबंधित खर्च. सामान्यतः, प्रति एकर मका उत्पादनाचा खर्च 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असू शकतो. तथापि, हायटेक ५१०६ सारख्या उच्च दर्जाच्या बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे प्रति एकर उत्पन्न ४० क्विंटल किंवा त्याहून अधिक होऊ शकते.
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील शेतकरी योगेश गायके यांच्या शेतात घेतलेल्या हायटेक कंपनीच्या पिक पाहणी संदर्भात कंपनीच्या वतीने नरेंद्र खैरनार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते हायटेक ५१०६ या वानाची शेतीमध्ये प्लॉट तयार करून दाखवला असता त्यात उत्पादन काढून दाखविले हायटेक ५१०६ हा मका कमी पाण्यात व कमी दिवसात येणारे वाण आहे शेतकरी वर्ग हा प्लॉट पाहून आश्चर्यचकी झाले त्यात शेतकरी वर्गाला योग्य वान निवड कशी करावी तसेच खत व्यवस्थापन लागवड पद्धत कशी करावी याबद्दल मार्गदर्शन सखोल करण्यात आले कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते जातेगाव ढेकू बोलठाण पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास विश्वंभर बेहरे, दिगंबर बच्छाव नरेंद्र खैरनार या अधिकाऱ्यांनी मोलाची मार्गदर्शन केले याप्रसंगी राहुल दिनकर साबळे मयूर यशवंत पाटील रोशन उत्तम कदम सौरभ सुनील लोखंडे सागर भीमराव पवार राकेश गोकुळ खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया:काही शेतकऱ्यांनी हायटेक ५१०६ बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाल्याचे आणि कीटक व रोग प्रतिकारशक्ती वाढल्याचे नमूद केले आहे. तसेच, या बियाण्यांमुळे पिकांची गुणवत्ता सुधारली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्याच्या ढेकू येथील शेत शिवार मध्ये लागवड केलेल्या मका बियाणामध्ये एकरी 44 क्विंटल मका उत्पादन झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आश्चर्याचे तसेच आनंदाचे वातावरण होते हेच बियाणे आपण लागवड करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून मांडली.
हायटेक ५१०६ मका बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळण्याची संधी आहे. तथापि, उत्पादन खर्च आणि नफा हे विविध घटकांवर अवलंबून असतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य शेती पद्धतींचा अवलंब करावा.
ढेकू तालुका नांदगाव येथे बियाणे कंपनीने आयोजित शिबिरामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे
