मोठ्या बातम्या

नाशिकसह मराठवाड्याचा असलेला कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी अर्थसंकल्पात झाली महत्वाची चर्चा

नाशिकसह मराठवाड्याचा असलेला कायमस्वरूपी दुष्काळ हटवण्यासाठी अर्थसंकल्पात झाली महत्वाची चर्चा


वेगवान नाशिक/एकनाथ भालेराव

नाशिक,दि.12 मार्च:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवक यासह राज्यातील सर्व घटकांसाठी तरतूद असलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सरकारने अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आहे. नाशिकसह मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे.तसेच राज्यातील गोरगरीब जनतेसाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेच्या सभागृहात केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते सभागृहात बोलत होते.

अर्थसंकल्पावरील चर्चेत छगन भुजबळ म्हणाले की, राज्याचे दरडोई उत्पन्न, सकल उत्पन्नाच्या आणि कर्जाबाबत इतर राज्यांच्या तुलनेत राज्याची चांगली स्थिती आहे. मात्र हा कर्जाचा रेशो २५ टक्क्याच्या पुढे जाणार नाही याची देखील आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात एकंदरीतच कृषी क्षेत्राची ८.७ टक्के वाढ पाहता आपल्या लक्षात येईल की कृषी क्षेत्राने आपल्याला तारले आहे. त्यादृष्टीने कृषी क्षेत्र व कांदा उत्पादक शेतकरी यांना अधिकाधिक मदत व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.आर्थिक पाहणी अहवालामध्ये उद्योग क्षेत्राची वाढ जरी कमी दिसत असली तरी उद्योग क्षेत्रातून मिळणारा महसूल हा खूप मोठा आहे हे पण आपल्याला विसरून चालणार नाही.

ते म्हणाले की, कोकणातील उल्हास व वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून उपलब्ध होणारे ५४.७० टीएमसी पाणी उचलण्याचे शासनाने काम हाती घेतले आहे.ही अतिशय आनंदाची बाब आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्रसंगी सभागृहाच्या वेलमध्ये उतरून देखील आपण सरकारचे लक्ष वेधले होते. जवळपास ९९ टीएमसी हून अधिक पाणी आपलं आजही तापी खोऱ्यात वाहून जात आहे ते आपण वळवू शकलेलो नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य संपविण्यासाठी हे आपल्या हक्काचं पाणी आणण्याची गरज आहे. कालेश्वरमच्या धर्तीवर आपल्यालाही यासाठी विशेष लक्ष देऊन हे पाणी वळवणे तितकेच आवश्यक आहे. विशेषता यासाठी मांजरपाडा ते डोंगरगाव हा तयार वहनमार्ग असल्याने मराठवाड्यात हे पाणी पोहचविणे सोपे होणार आहे. त्यामुळे या नाशिक उत्तर महाराष्ट्र सह मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन या योजनांना गती द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

ते म्हणाले की, आगामी काळात नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा अतिशय चांगला होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आपल्याला निर्माण करावयाच्या आहे त्या आत्तापासूनच करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही आपल्याला तातडीने करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने प्रयागराज कुंभमेळ्याच्या अगोदरच विशेष मदत उत्तर प्रदेश सरकारला केली होती. त्याच धर्तीवर आपल्यालाही केंद्राकडून अधिकची मदत मिळवावी लागणार आहे. तसेच कुंभमेळ्याची कामे दर्जेदार होण्यासाठी ती लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी त्यानी केली.

ते म्हणाले की, दूध व अंडी यांच्या उत्पादनाची राज्याची दरडोई उपलब्धता देशाच्या तुलनेत कमी आहे. एकीकडे आपण म्हणतो आपण उत्पादनात अग्रेसर आहे आणि एकीकडे आपलं राज्य मागे राहत असेल त्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्र हे कायम दरडोई उत्पन्नासह सर्व क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांकावर राहावं जशी सरकारची भूमिका आहे तशी विरोधकांची देखील भूमिका आहे त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यातील गोरगरीब जनतेच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने शिव भोजन ही अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे. राज्यात सुमारे दोन लाख गरीब आणि गरजू लोक रोज या योजनेचा लाभ घेतात यासाठी वार्षिक खर्च २०० कोटीच्या आताच आहे. विशेषता शिवभोजन थाळीवर सुमारे २० हजार लोकांचा रोजगार अवलंबून असल्याने ही योजना कायम सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसेच आरटीई, इतर मागास वसतीगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा भोजन भत्ता आदी मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे. प्रगत असलेल्या आपल्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर यामुळे राज्याची मान शरमेने खाली जाते. त्यामुळे हा निधी वेळेवर देण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.

ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना,सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची देणी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात विणकारांच्या दृष्टीने नागपूर मध्ये अर्बन हाट निर्माण करण्यात येणार आहे. खरंतर येवल्यात सर्वाधिक विणकर असून साडेपाचशे हून अधिक पैठणीची दुकाने आहेत त्यामुळे येवल्यातही विणकरांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी येवला येथे अर्बन हट सुरू करण्यात यावे. तसेच येवल्यामध्ये भव्यदिव्य अशी शिवसृष्टी प्रकल्पाचे काम सुरू असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी अधिक निधीची आवश्यकता असून शासनाने यासाठी अधिक निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. तसेच अतिशय अडचणींतून मांडलेल्या या सर्वसमावेशक अर्थसंकल्पाबद्दल उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांचे त्यांनी अभिनंदन केले.


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!