शेतकर्यांची कर्जमाफी चा शब्द खरा होणार का आजच्या अधिवेशनाकडे शेतकर्यांचे लक्ष
शेतकर्यांची कर्जमाफी चा शब्द खरा होणार का आजच्या अधिवेशनाकडे शेतकर्यांचे लक्ष

वेगवान /नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक: 10 मार्च/राज्य सरकारने दिलेला कर्जमाफीचा शब्द खरा करणार का? याकडे राज्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा दिलेला शब्द सरकारने खरा केल्याने कर्जमाफी ही होणार का याकडे आज होणाऱ्या अर्थसंकल्पपिय अधिवेशना कडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे
सध्या राज्य विधीमंडळचे चालू अधिवेशनामध्ये शेतकर्यांना कर्जमाफीची आशा लागली आहे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. शेतमालाला मिळणारा भाव व उत्पादन खर्च याचा ताळमेळ लागत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. एकीकडे आधुनिक भांडवली शेती करण्याच्या
नादात शेतकरी खर्च करत आहेत तर दुसरीकडे शेती विषयक लागणार्या साधनसामग्रीवर लादलेला जीएसटी कर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने कोणतीही अट न घालता चालू व थकित कर्जमाफी करावी असे शेतकरी मागणी करत आहेत.
सरसकट कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरू लागले आहे.
प्रत्येक शेतमालाला हमीभाव द्यावा
शेतकर्यांच्या प्रत्येक शेतमालाला हमीभाव सरकारने द्यावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. बाजार भाव गडगडल्यानंतर त्याचा भांडवली खर्च देखील निघत नाही. परिणामी शेतकर्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे.
शेतकर्यांच्या मनामध्ये शेतीविषयक नकारात्मकता व उदासीनता तयार झाली आहे. सरकारकडून शेतकर्यांना कर्जमाफी मिळावी तरच शेतकरी वर्ग टिकेल अशी मागणी जोर धरू लागली आहे

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये