मनोरंजन

‘आरडी’ चित्रपटातलं धमाल नवीन गाणं झालं लाँच, आदर्श शिंदे म्हणतोय…

'आरडी' २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला...


५ मार्च २०२५, मुंबई

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील ‘आरडी’ चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं “वढ पाचची…” (Vad Paachi Song) हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“वढ पाचची” हे अतिशय धमाल गाणं आहे. ‘पार्टी साँग’ (Party Song) म्हणता येईल असं हे गाणं आहे गीतकार मंदार चोळकर (Mandar Cholkar) लिखित कॅची शब्दरचना, वरूण लिखाते यांचे ताल धरायला लावणारं संगीत आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रत्येकाला नाचायला लावणारं आहे.

आजवर अनेक चित्रपटांतून पार्टी साँग आली असली, तरी ‘आरडी’ चित्रपटातलं “वढ पाचची” हे गाणं आणखी वेगळं आणि मनोरंजक आहे. साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस (Saad Entertainment, Kamal Enterprises) यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके (Ganesh Shinde, Avantika Kavathekar, Rahul Phaltankar, Bushra Sheikh, Ketan Pawar, Saanvi Walke) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आरडी’ चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आणखी थोडेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!