नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांना करोडो रुपयांचे अनुदान
... सर्व स्तरातून स्वागत... प्रतिक्षा संपली -- !

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
नाशिक / सिन्नर ,दि : 5 मार्च — राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे की ज्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होतो अखेर प्रतिक्षा संपली अन् शेतकऱ्यांना अनुदान जाहीर झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आला होता त्यात त्याला मोठा आधार मिळाला असल्याचे भावना व्यक्त होत आहे . या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी चिंता मिटली आहे.. सर्व स्तरातून स्वागत केले आहे व समाधान व्यक्त केले जात आहे.
ऑक्टोबर 2024 मधील अवकाळी पावसाच्या नुकसानीचे अनुदान मंजूर …
दि. 13 ऑक्टोबर 2024 ते दि. 19 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे चांदवड तालुक्यातील शेतीपिकांचे जे नुकसान झालेले होते, त्यासाठी शासनाच्या महसूल व वनविभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. चांदवड तालुक्यातील 108 गावांमधील 41764 बाधित शेतकऱ्यांसाठी रु.71.37 कोटी रक्कम मंजूर झालेली आहे.
सदर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरित केले जाणार आहे. त्यासाठी अशा शेतकऱ्यांची माहिती तहसील कार्यालयामार्फत पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे या कालावधीत नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे त्यावेळी करण्यात आलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावचे पंचनामे करणारे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक किंवा ग्राम पंचायत अधिकारी यांचेशी संपर्क करून स्वतःचे आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, सामाईक खाते असल्यास संमतीपत्र इ. कागदपत्रे जमा करावीत. तसेच ज्या शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाल्यानंतर यापुढे विशिष्ट क्रमांक (VK) प्राप्त होतील त्यांनी तात्काळ जवळच्या CSC केंद्रात जाऊन eKYC करून घेतल्यानंतरच त्यांना सदर अनुदान प्राप्त होणार आहे. तरी याद्वारे सर्व संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ कागदपत्रे जमा करणे व eKYC करणेबाबत तसेच सदर अनुदान व इतर शासन योजनांचा लाभ घेणेकरिता agristack योजनेंतर्गत farmer id तयार करून घेण्याचे तहसीलदार चांदवड यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.
