
वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
नाशिक,दि.5 मार्च:-प्रस्तावित पार-तापी-नर्मदा प्रकल्प रद्द झाल्याने महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रकल्पांसाठी पाणी उपलब्ध होत आहे. प्रस्तावित पार-तापी-नर्मदा प्रकल्प रद्द झाल्याने पार-तापी-नर्मदा योजनेतून उपलब्ध होत असलेल्या पाण्याचा पार-गोदावरी योजना तसेच इतर राज्यांतर्गत तुटीच्या खोऱ्यातील योजनांकरीता वळविण्याबाबत तसेच पार-तापी-नर्मदा योजनेतून उपलव्ध होणारे पाणी पार-गोदावरी योजनेकरीता अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने तलांकनिहाय मर्यादा न ठेवता सविस्तर अभ्यास करून अहवाल शासनास सादर करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पूढील कार्यवाही क्षेत्रिय स्तरावर प्रगतीत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.पार-गोदावरी एकात्मिक नदी जोड योजनेच्या अंमलबजावणीबाबत विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावरील लेखी उत्तरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे.
आमदार पंकज भुजबळ यांनी केलेल्या तारांकित प्रश्नात म्हटले की, नार-पार खोऱ्यातील अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी पार-गोदावरी ही एकात्मिक नदी जोड योजना राबविण्याची मागणी दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी वा त्यासुमारास लोकप्रतिनिधींनी जलसंपदा मंत्र्याकडे (गोदावरी व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ) यांचेकडे केलेली आहे. तसेच पायरपाडा आणि गुगुळ प्रवाही वळण (जि. नाशिक)योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.कायमस्वरूपी अवर्षणप्रवण असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला. नांदगाव, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील सिंचनासाठी नार पार खोऱ्यामधील उर्वरित सर्व पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी पार-गोदावरी एकात्मिक नदी जोड प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की,नार-पार खोऱ्यातील अतिरिक्त पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी पार-गोदावरी ही एकात्मिक नदी जोड योजना राबविण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रवाही वळण योजना पायरपाडा ता. दिंडोरी ही योजना उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत चतुर्थ सुप्रमामध्ये समाविष्ट असून चतुर्थ सुप्रमा शासन निर्णय दि. ०३ नोव्हेंबर २०२२ अन्वये मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून फेब्रुवारी-मार्च २०२५ अखेर काम सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच गुगुळ प्रवाही वळण योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यास प्राधिकरण कार्यालयाचे दि. १४ ऑगस्ट २०२४ पत्रान्वये मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने योजनेचे सविस्तर अन्वेषण व प्रकल्प अहवाल तयार करणेचे काम प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे.
तसेच सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचे परिगणन करताना पार गोदावरी नदी जोड योजना क्र. ३ व ४ करीता मुख्य अभियंता, कोकण प्रदेश, मुंबई यांनी उपलब्ध करून दिलेल्या एकूण ८५.४१ द.ल.घ.मी. पाण्यामधून उर्ध्व बाजूचा एकूण पाणी वापर ४०.१५ द.ल.घ.मी. वजा करून उर्वरीत ४५.११ द.ल.घ.मी. पाणी सद्यःस्थितीत उपलब्ध असल्याचे जलविज्ञान नाशिक यांचे मार्फत दिनांक २७ जून २०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाकरीता ४०.१५ द.ल.घ.मी.ची तूट आहे. प्रस्तावित पार-तापी-नर्मदा प्रकल्प रद्द झाल्याने महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रकल्पांसाठी पाणी उपलब्ध होत आहे. प्रस्तावित पार-तापी-नर्मदा प्रकल्प रद्द झाल्याने पार-तापी-नर्मदा योजनेतून उपलब्ध होत असलेल्या पाण्याचा पार-गोदावरी योजना तसेच इतर राज्यांतर्गत तुटीच्या खोऱ्यातील योजनांकरीता वळविण्याबाबत तसेच पार-तापी-नर्मदा योजनेतून उपलव्ध होणारे पाणी पार-गोदावरी योजनेकरीता अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने तलांकनिहाय मर्यादा न ठेवता सविस्तर अभ्यास करून अहवाल शासनास सादर करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पूढील कार्यवाही क्षेत्रिय स्तरावर प्रगतीत असल्याचे म्हटले आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये