याची देही याची डोळा पाहे अपार सोहळा या अभूतपूर्व सोहळ्यात आदर्श शिक्षिका श्रीमती शारदा अहिरे यांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान
याची देही याची डोळा पाहे अपार सोहळा या अभूतपूर्व सोहळ्यात आदर्श शिक्षिका श्रीमती शारदा अहिरे यांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान

वेगवान नाशिक / एकनाथ भालेराव
येवला / दिनांक: 4 मार्च/जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदीरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक सध्या नुकत्याच बदलीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
महादेववाडी( सायगाव ) तालुका येवला या शाळेत कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शारदा कमल लक्ष्मण अहिरे यांना सन 2025 या वर्षाच्या कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले . मराठी भाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याच
जन्मभूमीत वणी शिरवाडे या गावी नाशिक जिल्हा मराठा अध्यापक संघ यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या शिक्षकांना कविवर्य कुसुमाग्रज शिक्षक सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीमती शारदा अहिरे यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव व मोठे योगदान आहे. त्यांनी शाळेला मी ज्ञानी होणार ,सेल्फी विथ सक्सेस, स्टार ऑफ द थ मंथ, वाढदिवसाचे झाड, दिनांक तो पाढा,मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, जि.प अध्यक्ष चषक गायन तालुकास्तरीय व नृत्य स्पर्धा जिल्हास्तरीय निवड, विज्ञान प्रदर्शन यासारख्या अनेक वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून नावलौकिक मिळवून दिला आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त श्रीमती शारदा अहिरे यांना पती श्री समाधान अहिरे यांच्यासह नाशिक विभागाचे पदवीधर शिक्षक आमदार मा. श्री सत्यजित तांबे, दिंडोरी मतदार संघाचे विद्यमान खासदार मा .श्री भास्करराव भगरे यांच्या शुभहस्ते व नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुरेश सलादे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले .
“याची देही याची डोळा
पाहे अपार सोहळा ” अशा या अभूतपूर्व पुरस्कार सोहळ्यासाठी येवला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री संजय कुसाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मनीषा वाकचौरे, सायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अरुण खरोटे , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते काळू बोरसे, केदु देशमाने, जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री दिपक थोरात, श्री शिवाजी शिंदे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे येवला तालुकाध्यक्ष श्री रणजीत परदेशी , श्री प्रफुल्ल राहींज, श्री समाधान अहिरे , श्री सुनील गोविंद,श्री गोकुळ वाघ , श्री नवनाथ कांगणे , श्री अंबादास मोरे तसेच श्री संजय अहिरे, संगीता अहिरे, डॉ.प्राची अहिरे ,प्रणव अहिरे , संतोष पठारे, किरण बोंदरे,रवींद्रनाथ शेळके, किरण काकडे, विजय देवरे, महादेव खरात, गणेश घोडसरे, गोरखनाथ पवार,विजया शेलार ,रिनल जैन,आशिष कुलकर्णी, विलास सानप ,उंदीरवाडी शाळेचा शिक्षक स्टाफ,रवींद्र थळकर , अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये