सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्याऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी.

वेगवान नाशिक एकनाथ भालेराव
येवला ता. ४ मार्च
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आल्याचं या फोटो आणि व्हिडीओंमधून दिसून येत आहे. याच प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष बघायला मिळाला यातच मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा स्वीकारला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर निवेदन देण्यात येत असून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. यामुळे येथील शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील शिवसेना शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे उपतालुकाप्रमुख संतोष वल्टे,शरद कुदळ,सोमनाथ महाले,रामदास महाले आधीच्या नेतृत्वामध्ये येवला पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना निवेदन देण्यात आले. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच यामधील जे जे लोक आरोपी आहे त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील 302 सारखा महत्त्वाचा गुन्हा तातडीने दाखल करून त्यांना देखील अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाच्या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी कोणी कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवण्याचे काम केलं आहे अशा अधिकाऱ्यांवर देखील तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांना कायमस्वरूपी चे निलंबित करण्यात यावे.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जरी धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांची देखील या प्रकरणात सखोल चौकशी होऊन त्यांचे उच्चस्तरीय चौकशी करून आरोपी आढळल्यास त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये