सरकारने कांद्यावरील 20 टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे,सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,,,ॲड.समीर देशमुख
सरकारने कांद्यावरील 20 टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे,सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,,,ॲड.समीर देशमुख

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला /दिनांक: 3 मार्च/देशात कोणी उपाशीपोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन, पाऊस, थंडी, वादळीवारा याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो.
भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे.
शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल.
शेतकरी जगला तरच जग जगेल परंतु केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावर शेतकऱ्यांसाठी कोणती आर्थिक मदत दिलेली नाही.
तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही.
त्यामुळे येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतीसाठी २४ तास विज उपलब्ध व्हावी,
लोड शेडिंग बंद करावे, केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के शुल्क तात्काळ शून्य करावे,
महिलांना सुरक्षा द्यावी, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,
महागाई कमी करावी, युवकांना रोजगार मिळावा, पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करावी,
घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्या, राहुल सोलापूरकर वर कारवाई करावी या मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतीसाठी २४ तास वीज उपलब्ध व्हावी, महिलांना सुरक्षा द्यावी या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, राष्ट्रसेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अर्जुन कोकाटे, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, बळीराम शिंदे, निवृत्त मुख्याध्यापक दिनकर दाणे, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब सोनवणे, बाबासाहेब शिंदे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश सोमासे, युवक शहराध्यक्ष नाना शिंदे, मारुती सोमासे, भाऊसाहेब दाभाडे, शफिक शेख, कमलेश दाभाडे, जयप्रकाश वाघ, संतोष परदेशी, सुखदेव आहेर, सुखदेव मढवई, प्रा. जनार्दन धनगे, गणेश डिकले, जनार्दन भोरकडे, प्रा. अविनाश मांडवडे, अशोक नागपुरे, रावसाहेब खराटे, शिवाजी साताळकर, ज्ञानेश्वर काळे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये