
वेगवान नाशिक/अतुल सुर्यवंशी
बागलाण : तालुक्यातील पश्चिम पट्टयातुन कत्तलीसाठी जनावरे घेऊन काही वाहने जात असताना सटाणा – डांगसौंदाणे रोडवरील निकवेल फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने हे वाहन पलटी झाल्याने यातील एक गाय मृत्यू मूखी पडली असून दोन गायी व इतर जनावरे गंभीर जखमी झाले आहेत. दुसरे पिक वाहन एम. एच.४१ ए.यु. १७९८ या वाहनातून एकूण ८ जनावरे कत्तलीसाठी कोंबून सुसाट वेगाने मालेगावच्या दिशेने निघाले होते सदरील वाहनं चौंधाणे गावाशेजारील उतारावर पलटी झाल्याने यातील ही एक गाय मृत्यू मूखी पडली असून बाकी जनावरे गंभीर जखमी झाले आहेत. निकवेल व चौंधाणे गावातील गोप्रेमी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जखमी जनावरांना बाहेर काढत त्यांच्या वर औषधोपचार करत त्यांना चारा पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
वाहनांचा शोध घेत त्यांचा पाठलाग सुरु केल्याचे वाहन चालकांच्या लक्षात येताच त्यांनी वाहनांचा वेग वाढवल्याने भरधाव वेगाने जाणारी दोन पिकअप वाहने पहाटेच्या सुमारास पल्टी होवून झालेल्या अपघातात दोन गायी ठार झाल्या असून पाच जनावरे जखमी झाली आहेत.
दोन्ही वाहनात पंधरा जनावरे अतिशय निर्देयीपणे कोंबून सुसाट वेगाने ही दोन्ही वाहने मालेगावाच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळत आहे. यातील एम.एच. १४ सि.पी. ४१९१ या पिक वाहनातून एकूण सहा जनावरे निर्दयीपणे भरून कत्तली साठी मालेगावच्या दिशेने सुसाट वेगाने निघाली होती.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचत सटाणा पोलीस ठाण्यातील अधिकारी अपघातात ग्रस्त वाहनांचा पंचनामा करून जखमी झालेल्या जनावरांना तरुणांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविले आहे.
