येवला तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व पहिल्या हप्त्याचे वाटप

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
येवला /दिनांक 23 फेब्रुवारी/ पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दहा लाख लाभार्थ्यांना त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पार पडला याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तालुक्यातील लाभार्थ्यांना पंचायत समिती येथे बोलवून त्यांना मंजूर प्रमाणपत्र देण्यात आले तसेच त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता देखील जमा करण्यात आला यावेळी येवला तालुक्यातील लाभार्थ्यांना येवला तालुका पंचायत समिती येथे मंजूर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील उपस्थित होते.तालुका प्रमुख शेळके पाटील यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर तसेच येथील श्री. अण्णासाहेब पैठणकर एस. ओ. शामकांत पाटील संदीप चोळके यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.हा कार्यक्रम आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जे अधिकारी प्रयत्न करत आहे त्यांचा देखील सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गाव खेडे आणि वाड्या वस्तीवरील बेकर असलेल्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याचं काम राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे चालू आहे आणि याचा लाभ अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी पुढच्या काळात देखील प्रशासनाच्या यंत्रणेसोबत शिवसेना देखील खांद्याला खांदा लावून काम करेल आणि लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कक्ष पक्षाच्यावतीने तालुक्यामध्ये उभा करू असे श्री शेळके यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये