आनंदतरंग फाऊंडेशनच्या हॅप्पी बर्थडे बालनाट्याने पटकावला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक !
आनंदतरंग फाऊंडेशनच्या हॅप्पी बर्थडे बालनाट्याने पटकावला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक !

वेगवान नाशिक/एकनाथ भालेराव
वेगवान नाशिक /दिनांक 22 फेब्रुवारी/महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२४ /२५ नुकत्याच नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात संपन्न झाल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेमध्ये आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे यांची निर्मिती असलेल्या “हॅप्पी बर्थ डे” या बालनाट्याने नाशिक जिल्ह्यातून प्रथम तर विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता.
या नाटकाचे लेखन संकेत पगारे व दिग्दर्शक सतीश वराडे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील आनंदतरंग ही संस्था लोककलेतून लोकशिक्षण देणारी संस्था असुन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या संस्थेची नोंद झाली आहे.
तसेच मा. राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित असून आनंदतरंग फाउंडेशन वाघेरे , निर्मित हॅप्पी बर्थ डे या बालनाट्याची राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत निवड झाली होती.
हे नाटक ग्रामीण भागातील शिक्षण, स्वच्छता आणि सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकते. गावातून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यात लोक परसाला जात असतात .
त्यामुळे रोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हॅपी बडे होत असतो..
गाव अस्वच्छ असल्याने शाळेतल्या शिक्षिका गाव सोडण्याचा विचार करतात.
मुलांचा त्यांच्यावर खूप जीव असतो..मुलं त्यांना थांबवतात आणि गाव स्वच्छ करण्याचा निर्धार करतात.
ही मुलं आपल्या निरागस पण जिद्दी स्वभावाने कधी विनवणी करून, कधी हट्ट धरून, तर कधी डोळ्यांत अश्रू आणून आपल्या कुटुंबीयांना गावाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न करतात..
पण त्यात त्यांना अपयश येत .. लांडगा आला रे आला ह्या गोष्टीप्रमाणे गावात वाघ आणला जातो..शेवटी वाघ शिरल्याची अफवा पसरल्यावर लोक घाबरतात आणि शौचालयांचा वापर सुरू करतात.
अखेर, मुलांच्या प्रयत्नांमुळे गाव स्वच्छ होते, आणि बाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर भेट मिळते – एक स्वच्छ आणि आदर्श गाव….
हॅपी बर्थडे
आनंदतरंग फाउंडेशनच्या राज्यस्तरीय बाल नाट्य स्पर्धेत हॅपी बर्थडे या बालनाट्याने तृतीय क्रमांक पटकावला असुन या बालनाट्य लेखनाचे प्रथम पारितोषिक संकेत पगारे दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक सतीश वराडे यांना मिळाले आहे.
उत्कृष्ट अभिनयाबद्दल रौप्य पदक पुरुष हर्षदीप अहिरराव तर उत्कृष्ट रौप्य पदक स्त्री प्रांजल सोनवणे यास मिळालेला आहे.
दिनांक १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे जल्लोषात झालेल्या बालनाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत एकूण ३२ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री.संतोष आबाळे, श्री. गिरीश भुतकर, श्री. राजेश जाधव, श्री. संग्राम भालकर, श्रीमती राधिका देशपांडे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकासजी खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अँड .आशिष शेलार यांनी प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या बालनाटकांच्या संघांचे तर इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यात या संघाने या कलाकारांनी सर्वोत्तम कार्य कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या बाल नाट्याचे लेखक संकेत पगारे ,दिग्दर्शन सतिश वराडे ,नेपथ्य पायल जाधव /दुर्गेश गायकर,
संगीत रोहित सरोदे / अविनाश सांबरे ,
प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा ,
रंगभूषा हिंदवी आगळे / श्रुतिका करंजकर ,वेशभूषा वैभव पाटील ,
रंगमंच सहाय्यक सागर गवळी , सानिका पवार, दुर्गेश पाटील , आदित्य भानोसे, ओम जाधव ,विशेष सहकार्य शाहीर उत्तम गायकर, राजू गायकवाड, अभिजीत कोळेकर, अशोक मदगे यांचे लाभले असून यातील बाल म्हणून सौरभ क्षीरसागर ,हर्षदीप अहिरराव ,स्वरा शिरसाट, प्रांजल सोनवणे ,परिक्षीत नागरे ,आशुतोष चव्हाण,चेतन मुर्तडक,पियूष जाधव,साई कर्पे यांनी नाशिक जिल्ह्याच नेतृत्व करीत “हॅपी बर्थ डे ” या नाटकाची निवड राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सादरीकरणांती हॅप्पी बर्थडे या बालनाट्याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला असून सर्वच स्तरांतून कलावंत चमुचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याची माहिती आनंदतरंग फाउंडेशनचे शाहीर उत्तम गायकर यांनी दिली आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये