या समितीचे जिल्हास्तरीय कृषी गौरव पुरस्कार जाहीर
श्री इच्छापूर्ती शिवमंदिर समितीकडून पुरस्कार जाहीर

वेगवान नाशिक/Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी, दि.२१ फेब्रुवारी :-
भगूर- लहवित रोडवरील श्री इच्छापूर्ती शिवमंदिर समिती व भक्तगणांकडून महाशिवरात्रीनिमित्त दि.२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान भगूररत्न हभप गणेश महाराज करंजकर यांची श्री शिवमहापुराण (काशीखंड) कथा आयोजित करण्यात आली असून यानिमित्ताने कृषि गौरव पुरस्काराचे वितरण कृषीरत्न आबासाहेब मोरे, दिंडोरी कृषी पर्यावरण व देशी गोवर्धन संवर्धक संचालक व जगदीश पाटील जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी नाशिक यांच्या हस्ते उद्या शनिवार (दि.22) रोजी होणार आहे.
यात अनेक शेतकऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच कथाकार गणेश महाराज करंजकर यांचे ७ दिवस शिवमहापुराण भाविकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. दररोज दुपारी एक ते दोन शिवलीला अमृत पारायण, सायंकाळी साडेचार वाजता रुद्रयाग, भजन तसेच सायंकाळी ६ ते ८ वाजता महाशिवपुराण तसेच दररोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यास परिसरातील भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतीनिष्ठ उद्योजक गणेश निसाळ तसेच श्री ईच्छापूर्ती शिवमंदिर समितीने केले आहे.
चौकट
कृषी गौरव पुरस्कार्थी
उपविभागीय कृषी अधिकारी आर. डी. वाघ
कृषी अधिकारी जिल्हा परिषद विजयकुमार केदार
पशुधन विकास अधिकारी डॉ. वनिता चव्हाण
सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कल्पना पाटील
तंत्र अधिकारी ज्योस्तना पाटील
पशुधन विकास अधिकारी डॉ. संदीप पवार
कृषी परिवेक्षक संजय भांड
कृषी सहाय्यक जयश्री कुवर
कृषी शिक्षक पुरस्कार
व्हेटरी शास्त्रज्ञ डॉ. श्यामभाऊ पाटील
गोवर्धन चव्हाण विद्यापीठाचे कैलास मोरे
माती शास्त्रज्ञ मंगेश व्यवहारे
सहा. प्रा.योगेश भगुरे, एमव्हीपी कृषी विद्यापीठ योगेश भगूर
कृषी पत्रकार
नानासाहेब पाटील कृषी कार्यक्रमाधिकारी आकाशवाणी
सचिन वाघ कृषी पत्रकार
लक्ष्मण घाटोळ आयबीएन लोकमत
शेतकरी पुरस्कार
ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, वैभव आहेर, रोहिणी पाटील, अलका फडताळे, प्रांजल गायधनी, शैला जेजुरकर, गणेश कांगणे, अनिल हारक, भाऊसाहेब गोडसे.
