नाशिकचे राजकारण

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात …!

न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर मंत्री पदावर टांगती तलवार...


वेगवान नाशिक /  भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि. २९ फेब्रुवारी —  शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे माणिकराव कोकाटे यांना जेलवारी … या मुळे आधीच वादात सापडलेले मंत्री पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.कारण..या आमदारांनी घर नसल्याचे खोटं सांगुन चार सदनिका मिळवल्फेया होत्या . कागदपत्रांची फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी   दिंवंगवत माजी मंत्री तुकाराम डिघोळे यांनी तिस वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. कारण श्री , डिघोळे  सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना श्री, कोकाटे यांनी डिघोळे यांच्या मार्फत सदनिका मिळवण्यासाठी  कागदपत्रे सादर करून सदनिका मिळवल्या आहेत.ह्या संदर्भात नाशिक न्यायालयात आज सुनावणी झाली असता मंत्री कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, परंतु श्री, कोकाटे यांना जामीन मंजूर झाला असून सध्या तरी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार असल्याचे समजते परंतु श्री, कोकाटे यांच्या आमदारकी धोक्यात आली आहे तर कृषी मंत्री पदावर टांगती तलवार कायम राहील..

 

!!     अखेर परमेश्वर न्याय करतोच… शरद शिंदे
देर है अंधेर नही.अखेर सत्याचा विजय होतो….
मंत्री कोकाटेंना२वर्षे सजा….अनितिने मिळवलेली संपंती,सत्ता,मंत्रीपद, आमदारकी जातेच२०२४ सिन्नर मतदारसंघात गरिब शरद शिंदेपाटील निवडणुकीत उभा होता.३०लाख कर्जबाजारी होत गरिब कार्यकर्ते बरोबर घेऊन तालुक्यात३दौरे करत पाववडे,भेळी खात शरद शिंदेपाटील यांनी प्रचार केला झंझावात निर्माण केला होता.घाबरून माणिकराव कोकाटे व वाजे एकत्र येत गरिब शरद शिंदेपाटील भोवती चक्रव्यूह टाकत निवडणुकीत अडथळे आणले.सभा अडवली, शरद शिंदेपाटील यांची गाडी फोडली,बेनर फाडले,२५लाखात विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु गडी विकत नाही माघार घेत नाही म्हणून जिल्हाध्यक्ष विकत घेत मतदानाच्या दोन दिवस अगोदर शरद शिंदेपाटील यांची उमेदवारी रद्द असे पत्र जाहीर करत घात केला.डाव अर्ध्यावर मोडला.शरद शिंदेपाटील यांच्यावर दादागिरी करत उमेदवार रद्दचे गावोगावी अफवा पसरवून व कपटाने आमदारकी मिळवली ओरबाडून घेतली.तसेच कपटाने भुजबळ साहेब यांच मंत्री पद हिसकावून घेतले . अखेर परमेश्वर व न्याय देवतेन अनितिने मिळवलेली आमदारकी व मंत्री पद हिसकावून घेतले. अनितिने आमदार झालेल्या माणिकराव कोकाटेंना कोर्टाने दोन वर्षे शिक्षा सुनावली.२वर्षापेक्षा जास्त सजा झाली तर आमदार खासदार व मंत्री पद रद्द होते. आता कोकाटे यांना सुद्धा आमदारकी चा राजीनामा द्यावा अशी मागणी श्री, शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. !!

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

दरम्यान या संदर्भात शरद पवार गटाचे नेते उदय सांगळे यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे.. न्यायालयात निर्णय मान्य करून नैतिकता आदर राखून त्यांनी राजीनामा द्यावा परंतु हा त्यांच्या पक्षाचे नेते व त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाची दिशाभूल करणार्या व्यक्तिला पदावर राहण्याचा कुठल्याही अधिकार राहत नाही कारण न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर ते आमदार म्हणून कसं राहु शकता हा प्रश्न निर्माण झाला आहे..

            महाराष्ट्राचे राज्याचे कृषिमंत्री मंत्री व सिन्नर चे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार अशी ही शिक्षा आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावा विरोधात गुन्हा दाखल होता 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही याचिका दाखल केली होती भारतीय दंड विधान 420, 465 ,471 आणि 47  अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता,

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या न्यायालयाचा दणका… दोन वर्षांची सुनावली शिक्षा ,,,
सन – १९९५ मध्ये दाखल माजी मंत्री तुकाराम डिघोळे यांच्या मंत्री पदावर असताना कागदपत्रांची फेरफार व फसवणूक केली आहे अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यात आली होती, सदनिका मिळवल्या होत्या.या प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू सुनील कोकाटे यांना सुद्धा दोषी ठरवण्यात आले आहे. तब्बल पंचवीस- तिस वर्षे चाललेल्या या संदर्भात याचिकाकर्ते सिन्नर तालुक्यातील माजी आमदार व मंत्री तुकाराम डिघोळे यांचे मागील काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे व न्याय हक्कासाठी लढा देणारे कै.डिघोळे हे सध्या आपल्यात नाहीत हे दुर्दैव.. नुकत्याच झालेल्या नाशिक कोर्टात सुनावणी दरम्यान वरील निर्णय देण्यात आला असल्याची खात्रीलायक वृत्त आहे, त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी व मंत्री पदावर गदा आली तर… कारण न्यायालयाने सदर निर्णय कायम ठेवला तर आमदारकी सह कृषी मंत्री पदावर टांगती तलवार कायम राहील असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे…
दरम्यान  श्री, कोकाटे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.सदर निर्णय हा स्थानिक जिल्हा न्यायालयाचा आहे त्यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते.परंतु कोकाटे यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे… परंतु न्यायालयाने श्री, कोकाटे यांना दोषी ठरवल्यानंतर नाशिक जिल्हा सह सिन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!