
वेगवान नाशिक/Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी 18 फेब्रुवारी –
अतिशय चुरशीचा झालेल्या अंतिम सामन्यात देवळाली एफसी संघाने जालना संघावर 2-0 अशी मात करत प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे विजेत्या संघास 1,11,111 व उपविजेत्या संघास 55,555 रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात आले
गुरु स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून लागोपाठ 13 व्या वर्षी येथील आनंद रोड मैदानावर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धेचा अंतिम सामना हजारो प्रेक्षकाच्या साक्षीने डीएफसी देवळाली विरुद्ध जालना यांच्यात खेळला गेला. देवळाली संघाचा उजवा विंगर अनिकेत बहोत याला छोट्या डी क्षेत्रात मिळालेल्या पास च्या जोरावर त्याने दहाव्या मिनिटाला अफलातून गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. नंतर जालना संघाने प्रती हल्ले चढवत बरोबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र देवळालीचा भक्कम बचाव त्यांना भेदता आला नाही, पहिल्या हाफ साठी बाकी मिनिटे बाकी असताना अनिकेत बहोत ने पुन्हा एक जोरदार हल्ला चढवत देवळालीला 2-0 अशा आघाडीवर नेले, मध्यंतरानंतर जालना संघाकडून वेगवेगळे प्रयोग करत बरोबरी करण्यासाठी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले मात्र देवळालीची भक्कम संरक्षण फळी व गोलकीपर चे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांना भेदणे शक्य झाले नाही,व देवळाली संघाने हा सामना 2-0 असा जिंकून 12 वर्षा नंतर प्रथमच देवळालेला राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.
विजय संघ व खेळाडूंना उद्योजक महाराज बिरमानी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, के .जी. गुप्ता, संग्राम फडके, प्रिन्सि लांबा, मुकुंद झनकर, सूर्यकांत लवटे, निर्मल भंडारी, जोश ॲथोंनी, जगदीश गोडसे, नितीन जगळे, गौरव लखवानी, विकी खत्री, योगेश गजरे,इमरान शेख,परमजीत सिंग कोचर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
सामन्यादरम्यान रिचर्ड डिक्सन, सिद्धार्थ गाडे,नेरी डिसूजा,आनंद पांडे यांनी पंच म्हणून तर जॉन्सन डी व प्रिन्स सोगल यांनी लाईनमन म्हणून काम पाहिले.
स्पर्धा यशस्वितेसाठी संस्थापक अध्यक्ष शिबू जोस, राजेंद्र सोनवणे, वाजीद सय्यद, दत्तू सुजगुरे, नितीन गायकवाड, जिशान खान, जुबीन शहा, मनीष चावला, सुशील चव्हाण, नितीन देशमुख, शिनू जोस, कुणाल धीवरे, निलेश बंगाली, नितीन साळवे आदींसह क्लब सदस्य प्रयत्नशील होते. सामन्याचे धावते वर्णन जिशान खान, दीपक काळे यांनी सूत्रसंचालन प्रशांत कापसे, आभार मनोज गायकवाड यांनी मानले.
पारितोषिके
बेस्ट एंटरटेनमेंट प्लेयर -कापून
यूएफसी (पुणे)
बेस्ट अपकमिंग टीम- अनबीटेबल (नासिक)
बेस्ट डिफेन्स:- हेन्स पिल्ले (डीएफसी),
बेस्ट गोलकीपर रोहित थामेत (डीएफसी)
बेस्ट स्ट्रायकर – अनिकेत बहोत (डीएफसी)
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट:- -मुबारक , (फव्वाज एफसी जालना)
प्लेयर ऑफ द टीम:- थॉमस (फव्वाज एफसी जालना)
स्वर्गीय धीरूभाई डुलगज यांच्या कुटुंबीयांचा सन्मान तसेच विनोद लखन- बेस्ट डिटेक्टिव्ह पोलीस,व
जमील सय्यद- क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
