रोहिंग्याना रहिवासी दाखला मात्र स्थानिक नागरिकांना रेषेन कार्ड साठी आटापिटा …
नाशिक - मालेगाव येथील रहिवाशांची तक्रार !

वेगवान नाशिक / मारुती जगधाने
बागलाण : दि, १७ फेब्रुवारी — संघर्ष करावा लागतो तो फक्त रेषेण कार्ड मिळवण्यासाठी दुसरीकडे मात्र बांगलादेशी घुसखोरी करून रहिवाशी दाखला मिळवुन राजरोसपणे राहतात… महाराष्ट्रातील शासकीय योजनाचा स्थानिक लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे …
नागरिकांना रेशन कार्ड मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागतो हजारो रुपये खर्च करूनही रेशन कार्ड हातात मिळत नाही दलालांच्या हातात पैसे दिल्यानंतर कुठे रेशन कार्ड हाती लागते तरीदेखी उच्चल रेशन त्यावर मिळत नाही त्यानंतर अजून काहीतरी वेगळेच प्रकार करावे लागतात तेव्हा कुठे दोन पाच किलो धान्य हाताशी पडतात. असे असताना देखील घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश या नागरिकांना नाशिक आणि नांदगाव मध्ये मालेगाव सह जिल्ह्यात ठिकठिकाणी घुसकुरी करण्यासाठी प्रवेश मिळतो त्यांना रहिवासी दाखला मिळतोय आधार कार्ड मिळत आहे आणि या सगळ्या कार्डांच्या आधारावरती त्यांना रेशन कार्ड मिळते रहिवाशी दाखलाही मिळते मग अशा असताना स्थानिक नागरिकांवर काही जळ पोहचले जाते त्यांच्यावरती का अन्याय केला जातो या संदर्भातले तर्क्वितर्क नागरिकांमध्ये उमरतात या संदर्भात थोडक्यात माहिती काय घडले जिल्ह्यामध्ये.
नाशिक आणि मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरीचे प्रकरण गंभीर बनले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना भारतीय नागरिक बनवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे, ज्यामुळे मालेगावमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
नाशिक पोलिसांनी अलीकडेच आडगाव भागातून आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे नागरिक अवैधरित्या भारतात प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे राहत होते. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई ही जात आणि धर्मापलीकडचा विषय असल्याचे सांगितले आहे. त्यांनी घुसखोरांचे समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वतःचा विचार करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणांमुळे नाशिक आणि मालेगावमध्ये सामाजिक आणि राजकीय तणाव वाढला आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या घुसखोरींना थांबवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे, तसेच नागरिकांनीही सतर्क राहून अशा अवैध क्रियाकलापांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी.
म्हणजे जिल्ह्यात आणि राज्यात होणारी बांगलादेशांची घुसखोरी थांबण्यास अधिक मदत होईल.
:
