नाशिकचे राजकारण

ऐन भूमिपूजनाच्या दिवशी पाणीपुरवठा योजनेचा श्रेयवाद चव्हाट्यावर

शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर समर्थकांनी लावलेले होर्डिंग पोलिसांच्या सूचनेनुसार काढले


वेगवान नाशिक/ Wegwan Nashik 

विशेष प्रतिनिधी दि.१६ फेब्रुवारी…

 

भगूर शहरात आज उपमुख्यमंत्री अजित दादा पवार दाखल होत असताना शिवसेना शिंदे गटाचे उपनेते व संपर्कप्रमुख असलेले भगूर येथील विजय करंजकर यांच्या समर्थकांनी नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्याचे होर्डिंग येथील अहुजा कॉम्प्लेक्स परिसरात लावले होते ते होर्डिंग पोलिसांच्या सूचनेनुसार काढण्यात आले आहे. यामुळे शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट अशी अजित पवार गट यांची आपसात असलेला विरोध उघडपणे दिसून आला. यावेळी अजित पवार करत असलेले भूमिपूजन करणे हे
पोरकटपणा करत असल्याचे वक्तव्य ही त्यांनी केले.
दरम्यान आमदार सरोज आहिरे यांनी ही पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्याचे आधीच विविध माध्यमातून निदर्शनास आणून दिले असले तरी विजय करंजकर मात्र आपण ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केल्याचे सांगत आहे. या आपसातील कामाच्या श्रेया बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. यापूर्वीच विजय करंजकर समर्थकांनी भगूर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रमुख मार्गावर माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे पत्र व त्यांच्या फोटोसह परिसरात मोठमोठाले फलक लावले होते मात्र आमदार सरोजाहिरे यांनी सभेच्या मार्गावर असलेला हा फलक पोलिसांना सांगून काढल्याचा आरोप शिंदे गटाचे संपर्कप्रमुख व उपनेते विजय करंजकर समर्थकांनी केला आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आभार दौरा घेतला आणि नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेदरम्यान भगूर येथील पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव विजय करंजकर यांनी आपल्याकडे दिला होता आणि भगूरच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा या उद्देशाने सदरची पाणीपुरवठा योजना तात्काळ मंजूर करून दिली दिल्याचा याचा उल्लेख आपल्या भाषणातून केला होता.
याबाबत विजय करंजकर यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत श्रेयवाद कुठेतरी थांबला पाहिजे. भगूरमध्ये शिवसेनेची सत्ता असून आपण वेळोवेळी नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते असल्याने नगरपालिकेतील विविध विकासात्मक कामे मंजूर केली आहे यासाठी आपण एकनाथ शिंदे यांना देखील उद्घाटनासाठी भगूर मध्ये येणार असून त्याचे निमंत्रण देखील आपण दिले आहे. सदर योजनेचा आराखडा आपण सात वर्षांपूर्वीच तयार केला असल्याचे सांगताना एमजीपी कडे प्रस्ताव सादर करून त्याला आपण मंजुरी घेतल्याचे सांगितले. मात्र अचानकपणे अजित पवार युतीचे नेते असले तरी ज्याचे काम असले त्याला त्याचे श्रेय मिळाले पाहिजे असे त्यांनी सांगताना ‘ कोणाच्या कामावर कोणीही डल्ला मारावा हि अशोभनीय बाब आहे ‘ असा खोचक टोला आमदार सरोज आहिरे यांना लगावल्याचे असे देखील वक्तव्य केले. तर आमदार सरोज अहिरे यांनी आपण ही पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी सातत्याने गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
मात्र पाणीपुरवठा योजना कोणीही आणली असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे मार्गी लागणार असल्याने आपसातील श्रेय वादाची लढाई व राजकारण बाजूला ठेवावे असे मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!