सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक, 6 दुचाकीही जप्त
सिन्नर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी 16 फेब्रुवारी-
स्थानिक गुन्हे शाखेकडुन सराईत मोटारसायकल चोरटयास अटक चोरीच्या 06 मोटारसायकली हस्तगत
दि ०६/०२/२०२५ रोजी सागर शंकर पालवे रा नांदुरशिंगोटे ता. सिन्नर यांची स्प्लेंडर मोटरसायकल क्र.MH 15 HK 6738 ही रात्रीच्या सुमारास चोरीस गेलेली होती सदर बाबत वावी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर मोटारसायकल चोरीचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता.
दि १५/०२/२५ रोजी पोलीस निरीक्षक राजु सुर्वे ,स्थानिक गुन्हे शाखा यांना बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा संगमनेर येथील सराईत मोटारसायकल चोर अक्षय सावन तामचिकर याने केलेला असुन तो गॅस रिपेंअरींग चे कामे करुन मोटारसायकल देखिल चोरी करत असुन तो पांढुर्ली चौफुली परीसरात येणार असलेबाबत माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढुर्ली चौफुली परीसरात साध्या वेशात सापळा रचून अक्षय सावन तामचिकर रा. घुलेवाडी, संगमनेर जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.
त्याचेकडेस चौकशी केली असता त्याने देवळाली कॅम्प, सिन्नर, नांदुशिंगोटे,मोशि,पुणे,संगमनेर परिसरातून मोटर सायकल चोरी करुन आणलेल्या दुचाकींबाबत माहिती दिली. त्याप्रमाणे त्याचेकडुन ०२ हिरो स्प्लेंडर, ०२ हीरो HF डीलक्स, ०१ TVS स्टार सिटी, ०१ बजाज डिस्कव्हर अशा एकुण ०६ चोरीच्या मोटारसायकली किंमत ३,१०,०००/- रु किमतीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहे. आरोपीतास पुढील कारवाई कामी वावी पोलिस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरचे आरोपीताकडुन अजुन बरेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्षक आदीत्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे,स्थानिक गुन्हे शाखा, सपोनि/संदेश पवार, अंमलदार नवनाथ सानप,विनोद टिळे,हेमंत गिलबिले,प्रदीप बहीरम,प्रकाश कासार यांचे पथकाने केलेली आहे.
