वृत्तपत्रात नाव प्रसिद्ध होण्याआधी थकबाकी भरा

*वृत्तपत्रात नाव प्रसिद्ध होण्याआधी थकबाकी भरा*
जिल्हा बँकेचे आवाहन: बागलाण मधील थकबाकीदारांना अंतिम नोटिसा
अतुल सुर्यवंशी/ वेगवान नाशिक
सटाणा: जिल्हा बँकेने टॉप थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळविला आहे. बागलाण तालुक्यातील थकबाकीदारांना कर्ज वसुली बाबत बँकेने अंतिम नोटिसा बजावल्या आहेत वेळीच कर्ज भरून सहकार्य न केल्यास या बड्या थकबाकीदार यांचे नाव वृत्तपत्रात प्रसिद्ध करून कारवाईचा भडगाव उगारला जाणार आहे त्यामुळे आता बागलाण तालुक्यातील थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहे सटाणा विभागातील विविध शाखांमध्ये जप्तीची बोजे लावण्याची कार्यवाही चालू झालेली असून जिल्हा स्तरावरील टॉप १०० वर सुरू असलेली कारवाई आता बागलाण मधील टॉप १५० थकबाकीदारांवर होणार आहे बागलाणमध्ये एकूण ४३३७ थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे ५९ कोटी ६१ लाख ९६००० अधिक होणारे व्याज इतकी थकबाकी आहे त्यापैकी तालुक्यातील दीडशे टॉप बाकीदारांकडे २१ कोटी ८८ लाख ९५ हजार २०९/- अधिक होणारे व्याज इतकी थकबाकी आहे कर्ज वसुली बाबत संबंधीतांना जिल्हा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावल्या आहेत तत्पूर्वी नवीन समोपचार योजनेचा लाभ घेऊन १० सभासदांनी ६७ लाख रुपयांचा भरणा करून कारवाई टाळली आहे. बागलाण विभागात जिल्हा बँकेतर्फे आजपर्यंत ८८ शेतकऱ्यांचे लिलाव लावण्यात आले.उर्वरित ८० थकबाकीदारांनी लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन १००/८५ अंतर्गत कारवाई करून त्यांच्या सातबारा उतारा बँकेचे नाव लावण्याची कारवाई करण्यात आली आहे थकबाकी वसुलीसाठी सहाय्यक निबंधक,सटाणा विभागीय अधिकारी,सहा.विभागीय अधिकारी,बँक निरीक्षक,संस्था सचिव यांनी कंबर कसली आहे युद्ध पातळीवर वसुलीचे कामकाज सुरू आहे.
” बागलाण तालुक्यातील बड्या थककबाकीदारांवर तातडीची वसुलीची कारवाई होणार आहे तत्पूर्वी त्यांना अंतिम नोटीसा देऊन थकबाकी भरण्याविषयी कळविण्यात आले आहे त्यातून होणारी कारवाई टाळावीअन्यथा त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जातील पुढील कारवाई बँक व सहकार खाते संयुक्तरीत्या करेल.”
-आर.एस.भामरे विभागीय अधिकारी, जिल्हा बँक,सटाणा
