नाशिक ग्रामीण

वाळुची चोरटी वाहतूक करणारे डंपर चाळीसगाव पोलिसांनी पकडले !!

संबंधितांवर पोलिससांची कायदेशीर....


वेगवान मराठी / मारुती जगधाने

बागलाण , दि : १४ फेब्रुवारी —  वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर चाळीसगाव पोलिसांनी पकडले –

भडगावचा डंपर चालकावर गुन्हा दाखल.गौण खनिज म्हणजे मुरुम, वाळू, गिट्टी, चुनखडी, माती इत्यादी खनिजे, जी बांधकाम आणि इतर उपयोगांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. परंतु, अनेक ठिकाणी या खनिजांची चोरी मोठ्या प्रमाणात होते, ज्यामुळे शासनाला महसुली तोटा होतो आणि पर्यावरणीय हानी देखील होते. असाच एक गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणारा हायवा डंपर चाळीसगाव पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेमुळे वाळूचा मोठा रॉकट बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते.चाळीसगाव तालुक्यात भडगाव कडून चाळीसगाव कडून चोरीची वाळू भरलेले डंपर मोठ्या प्रमाणावर दाखल होत असून रात्रभर ही चोरटी वाळू वाहतूक सुरु असते दि 14 रोजी रात्री चाळीसगाव शहर पोलीस गस्त घालत असताना भडगाव कडून चाळीसगाव कडे भरधाव वेगाने येणारे डंपर पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून डम्पर मालक पाटील रा. मु.पो.वडदे, ता. भडगांव सह चालकावर चाळीसगाव पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून 22 लाख रुपये किमतीचे डम्पर व 50 हजार रुपये किमतीची 5 ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाळूचे डम्पर पोलिसांनी पकडल्याने वाळू माफी्यांचे धाबे दणानले आहे. रात्रभर भडगाव रोडवर वाळू वाहतूक होते याला आशीर्वाद कुणाचा हा विषय आता चर्चेला आला असून प्रांताधिकारी व तहसीलदार चाळीसगाव यांनी कारवाई करावी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी जळगांव यांनी चाळीसगाव भडगाव रोडवर रात्रीची विशेष गस्ती पथकाची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की भडगाव कडून चाळीसगाव कडे भरधाव वेगाने येणारे MH 19 CY 8901 या डंपर मधून पाणी गळत असल्याने गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार नितीश पाटील व पो कॉ गोपाल बाळु पाटील यांना संशय आल्याने त्यांनी गस्तीवर असलेले हवालदार अजय पाटील, पोलीस नाईक नितीन आगोणे, पो कॉ अमोल भोसले, केतन सुर्यवंशी, विलास पवार यांना बोलावून सदर डम्पर अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढला तेव्हा या पथकाने पाठलाग करून भडगांव रोडवर थांबवून चौकशी केली असता त्यात विना परवाना चोरटी वाळू भरलेली असल्याचे दिसले चालक प्रदिप साळुंखे 48 रा. दत्त् मंदिर जवळ, यशवंत नगर, भडगांव याची चौकशी करून वाळू बाबत विचारणा केल्यावर सदर वाळू विना परवाना असून मी वाहनावर चालक म्हणुन नोकरीस आहे. पाटील. रा मु.पो.वडदे, ता. भडगांव याच्या मालकीचे असून सदर वाहनात तो स्व.ता माझ्याकडे वाळु भरुन देत असतो. त्याने सांगितल्या प्रमाणे मी दररोज रात्री सदर वाहनातुन अवैधरित्या गौण खनिजाची (वाळु) वाहतुक करीत असतो. आज देखील डंपर मालकाने मला चाळीसगांव येथे सदर डंपर मधील वाळु खाली करण्याबाबत सांगितले होते.” अशी माहिती वाहन चालकाने दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला वरील दोघांवर बी.एन.एस. कलम 303(2), 3(5), 45 सह खाण आणि खनिज अधिनयम 1957 चे कलम 21, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48(7), 48(8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.बेकायदेशीर उत्खनन: शासनाची परवानगी न घेता किंवा परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात खनिज काढणे

  1.             अनधिकृत वाहतूक: रॉयल्टी भरल्याशिवाय किंवा बनावट पावतीच्या आधारे खनिजांची वाहतूक.
    स्थानिक प्रशासनाची मिलीभगत: काही वेळा महसूल विभाग किंवा पोलिसांची संगनमताने अवैध खनिज वाहतूक होते.
    खनिज कायदा 1957: भारत सरकारने हा कायदा लागू केला असून, त्यानुसार कोणत्याही व्यक्तीने शासनाच्या परवानगीशिवाय गौण खनिज उत्खनन करू नये.
    पर्यावरण संरक्षण कायदा 1986: अनधिकृत खनिज उत्खननामुळे पर्यावरणीय नुकसान झाल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते.
    भाष्कर वाळू धोरण: महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी धोरणे आखली आहेत.
    महसूल विभाग आणि पोलिसांकडून अवैध उत्खनन रोखण्यासाठी नियमित तपासणी केली जाते.
    अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई केली जाते.
    संबंधितांवर गुन्हे दाखल करून शिक्षेची तरतूद आहे.
    गौण खनिज चोरीमुळे शासनाचे नुकसान तर होतेच, पण नैसर्गिक संसाधनांचीही हानी होते. यावर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, पर्यावरण विभाग आणि नागरिकांनी एकत्र येऊन उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. वरील घटनेबाबत चाळीसगाव तालुका आणि जळगाव जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे परंतु या घटनेमुळे गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांचे मात्र धाबे दनानले आहे आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!