१३ व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेला या शहरात सुरूवात
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भव्य शुभारंभ सोहळा

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी, 12 फेब्रुवारी –
गुरु स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित येथील आनंद रोड मैदानावर आयोजित १३ व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा भव्य शुभारंभ सोहळा काल बुधवार दि.१२ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रारंभी मैदानावर सुप्रसिद्ध उदयोजक महाराज बिरमानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत व टॉस उडवत करण्यात आला. यावेळी नवीन गुरुनानी, जयंत गाडेकर, परमजित सिंग कोचर, राजाभाऊ सोनवणे,संस्थापक अध्यक्ष शिबू जोस व संयोजक वाजिद सय्यद, कार्यकारणी अध्यक्ष मनीष चावला, झीशान खान, जुबिन शहा, दत्ता सुजगुरे, गुंडाप्पा देवकर, प्रवीण पाळदे, विनोद लखन,अनिल पवार, संदीप गोडसे, माधव गोडसे, गोकुळ मोजाड, संदीप शिंदे,सतीश कासार,आशितोष चौधरी आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लहानग्या फुटबॉल खेळाडूंच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेस शुभारंभ केला. त्यानंतर दोन्ही संघाची ओळख परेड घेत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पहिल्या सामन्यात अनबिटेबल नाशिक संघ विरुद्ध आर के बॉईज छत्रपती संभाजी नगर यांनी निर्धारित वेळेत २-२ असे गोल केल्याने पॅनल्टी शूटआऊटमध्ये आरके बॉईजने ३ गोल करत उपांत्य पूर्व सामना गाठला. डीएफसी देवळाली विरुद्ध आरसीसी जालना यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात निर्धारित वेळेत देवळाली संघाने अत्यंत खिलाडूवृत्तीने रक्षण करत १-० च्या फरकाने उपांत्य पूर्व फेरी प्रवेश केला. सामन्यादरम्यान रिचर्ड डिक्सन, सिद्धार्थ गाडे,नेरी डिसूजा यांनी पंच म्हणून तर जॉन्सन डी व प्रिन्स सोगल यांनी लाईनमन म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले. यशस्वीतेसाठी जमील सय्यद, शिनू जोस यांचेसह कार्यकारणी अध्यक्ष मनीष चावला, उपाध्यक्ष सुशील चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन साळवे, सचिव मनोज गायकवाड, खजिनदार कुणाल धिवरे, सलीम खान,तरुण पंजाबी व फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहे.
