10, 12 नाही तर गाईने 24 तासामध्ये दिले 82 लीटर दुध,एवढं दुध देण्याचे कारण

साहेबराव ठाकरे
लुधियाना वरुन – गाईंचा व्यवसाय कधी यशस्वी होतो तर त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गाईंना आपण देणार खाद्य महाराष्ट्रामध्ये अजूनही पाहिजे त्या प्रमाणात दूध व्यवसायामध्ये महाराष्ट्राने प्रगती केलेली दिसून येत नाही पंजाबच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आजही वीस वर्षांनी पाठीमागे असल्याचे दिसून येत.
पंजाब मध्ये पीडीएफ संस्थेचा एक मिळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये गाईंचा कॉम्पिटिशन दर वर्षाला भरवण्यात येत. कोणती गाय उत्कृष्ट, कोणत्या गाईने किती दूध दिले, यामध्ये सर्वात उत्कृष्ट गाय कोणती, अशा पद्धतीचे हे पारितोषिक असतात, काही लाखांमध्ये हे पारितोषिक दिले जातात, सर्वात जास्त दूध कोणत्या गाईने दिल, पहिल्या वेताच्या गाईंना किती दूध दिले, अशा प्रकारचे वेगवेगळे पारितोषिक या पीडीएफ संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये असतात, पीडीएफ संस्था दूध आणि नसल यावरती चांगल्या पद्धतीने काम करत आलेली आहे.
लुधियाना येथील १८ व्या आंतरराष्ट्रीय PDFA डेअरी आणि कृषी प्रदर्शनात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित
लुधियाना, पंजाब – जगरावं येथील १८ व्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय PDFA डेअरी आणि कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक दुग्धजन्य पशु स्पर्धा झाल्या.
८२ लिटर दूध – एक नवीन राष्ट्रीय विक्रम!
PDFA चे प्रेस सचिव रेशम सिंग भुल्लर यांनी घोषणा केली की, नूरपूर हकिमा (मोगा) येथील हरप्रीत सिंग यांच्या मालकीच्या ओंकार डेअरी फार्ममधील होल्स्टीन फ्रायझियन (HF) जातीच्या गायीने २४ तासांत (तीन दूध काढण्याच्या सत्रात) ८२ लिटर दूध उत्पादन करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
दुसरे स्थान: पालिया खुर्द (पटियाला) येथील अगरदीप सिंग यांची गाय, ज्याने ७८.५७० लिटर उत्पादन केले.
तिसरे स्थान: कुलार (लुधियाना) येथील संधू डेअरी फार्मची गाय, ज्याने ७५.६९० लिटर उत्पादन केले.
मनोरंजक म्हणजे, २०२४ मध्ये, हरप्रीत सिंगच्या एचएफ गायीने ७४.५ लिटर दूध देऊन राष्ट्रीय विक्रमही मोडला होता.
इतर स्पर्धांमधील विजेते
एचएफ (चार-दात) श्रेणी:
पहिले स्थान: बरार डेअरी फार्म (घोलिया खुर्द, मोगा) – ६२.२५० किलो दूध
दुसरे स्थान: सतींदर सिंगची गाय (मोरलिया कलान, रोपार) – ५६.४५२ किलो
तिसरे स्थान: तरनवीर सिंगची गाय (पलिया खुर्द, पटियाला) – ५५.२९० किलो
एचएफ (दोन-दात) श्रेणी:
पहिले स्थान: तरनवीर सिंगची गाय (पलिया खुर्द, पटियाला) – ५५.५५२ किलो
दुसरे स्थान: प्रवीण सिंगची गाय (लेहरा बेट, फिरोजपूर) – ५४.९५२ किलो
तिसरे स्थान: सिंदूरी फार्मची गाय (कुलर, लुधियाना) – ५०.७५२ किलो
जर्सी गाय स्पर्धेतील विजेते
पहिले स्थान: संधू डेअरी फार्मची गाय (कुलर)
दुसरे स्थान: प्रवीण कौरची गाय (लेहरा बेट, फिरोजपूर)
तिसरे स्थान: बलदेव सिंगची गाय (गालिब खेरी, करनाल)
म्हशींच्या दूध उत्पादन स्पर्धा
मुर्रा जातीच्या म्हशी:
पहिले स्थान: अंकुरची म्हशी (फ्रान्स वाला, कैथल, हरियाणा) – ३१.८४० किलो
दुसरे आणि तिसरे स्थान: पंजाब सिंगची म्हशी (चेत्रा, पटियाला)
निली रवी म्हशी:
पहिले स्थान: रछपाल सिंगची म्हशी (बालतोहा, तरणतारन) – २४.५८७ किलो
दुसरे स्थान: अमरजीत सिंगची म्हशी (दारोली भाईके, मोगा)
तिसरे स्थान: सरस्वती डेअरी फार्मची म्हशी (अधियाना, लुधियाना)
सर्वोत्तम डेअरी फार्म पुरस्कार
या वर्षीचा सर्वोत्कृष्ट डेअरी फार्म पुरस्कार हनी सिंगच्या मालकीच्या हीरा डेअरी फार्म (कोट धर्मू, मानसा) ला प्रदान करण्यात आला.
पंजाबचे कृषी मंत्री गुरमीत सिंग खुदियान, आमदार सरबजीत कौर मनुके आणि पीडीएफए पंजाबचे अध्यक्ष दलजीत सिंग सदरपुरा यांनी विजेत्यांना सन्मानित करून कार्यक्रमाचा समारोप केला.
एवढ दुध देण्याचे कारण काय
पंजाब मधील जे दूध उत्पादक आहेत ते दूध उत्पादक मक्याचा मुरघास करतात. मक्याचा मुरघास हे त्या गाईंसाठी सर्वात प्रथम खाद्य आणि दुध वाढीसाठी वरदान आहे. मक्याचा मुरघास ( याला सायलेज किंवा मक्याचा आचार म्हणतात ) म्हणजे हिरवी मका ज्याला कणसं अलेले असतात. आणि मकाचे हिरवे ताट व मकाचे कणीस हे ब्राझील प्रणालीच्या कुट्टी यंत्राच्या साह्याने कुटी करून त्या कंसामधील दाण्याचा पूर्ण चुरा केला जातो आणि चुरा केल्यामुळे त्या कंसाच्या दाण्याचं प्रोटीन संपूर्ण मकाच्या पानावरती पसरल्या जाते. त्यामुळे तो चारा अधिक दर्जेदार बनतो आणि यामुळे गाईच्या दूध वाढीमध्ये याचा सर्वात मोठा फायदा होतो.
महाराष्ट्रामध्ये असे मशीनची कमतरता आहे. महाराष्ट्रामध्ये कुटी करताना दुध उत्पादक मुरघास ट्रॅक्टर जोडून 1 ते दिड लाखाच्या यंत्राच्या साह्याने कुटी केली जाते. त्या कुटीसाठी 4 ते 5 पाते असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात मुरघास तयार होत नाही. त्यामध्ये सगड मकाचे दाने येतात. मात्र पंजाब मधील ट्रॅक्टवर चालणा-या ब्राझील प्राणालिच्या मुरघास यंत्राला 12 पाते असतात. ते मशिन तीस लाखाच्या पुढे जाते. त्यामुळे त्यातून होणारा मुरघास चांगला दर्जेचा असतो. सध्या हे मशीन नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथे आले आहे. निसर्ग अॅग्रो नावाने हे मशीन सुरु आहे. उभी मका मुरघास करण्याचे यंत्र नाशिक जिल्ह्यात काजीसांगवी येथे आल्यामुळे लोक मुरघास व मका कापनीसाठी या मशीनकडे नंबर लावून बसले आहे. जर तुम्हाला मुरघास करायचा असेल किंवा उभी मका कापणी करायचाी असेल तर तुम्ही 9423590179 या क्रमांकवर संपर्क साधावा. असे आवाहन निसर्ग अॅग्रोचे संचालक साहेबराव ठाकरे यांनी केले आहे.
शेतक-यांकडून मुरघासासाठी निसर्ग अॅग्रो काही हेक्टरवर मका खरेदी करत आहे. शेतकरी मका सोंगणी करुन मकाचे दाने काढून बाजारात विक्री करत असतात. मक्याला दान्यासाठी 2200 क्विंटलचा भाव मिळतो. मुरघासासाठी 2600 रुपये टन भाव मिळतो. मुरघासमध्ये मक्याचा चा-याचे वजन होते. त्यामुळे शेतक-यांना मुरघास दान्यापेक्षा फायदेशील असल्याचे चांदवड तालुक्यातील शिंदे येथील शेतकरी गोरक्षनाथ शिंदे यांनी वेगवान मराठी शी बोलतांना सांगितले. एकरी मक्याचे मुरघास 25 ते 30 टनापर्यंत उत्पादन निघते.
