येथील मैदानावर रंगणार राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
दीड लाख रुपयापेक्षा अधिक रकमेची बक्षिसे, वैयक्तिक बक्षिसांचेही होणार वाटप

देवळालीत बुधवार दि.12 पासून राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
देशभरातील नामांकित संघांचा असणार सहभाग
देवळाली कॅम्प:-
येथील गुरु स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षापासून आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे यंदाही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष शिबू जोस व संयोजक वाजिद सय्यद यांनी दिली आहे. परवा बुधवार दि.१२ फेब्रुवारी ते सोमवार दि.१७ दरम्यान येथील आनंद रोड मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघास 1 लाख 11 हजार अकरा रुपये तर उपविजेत्या संघास 55 हजार 555 रू. रोख रक्कम, आकर्षक व भव्य चषक प्रदान केला जाणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट खेळाड, गोलकीपर अशी वैयक्तिक बक्षिसे ही प्रदान केले जाणार आहे या स्पर्धेसाठी देशातील केरळ, हैदराबाद,गुजरात, तेलंगणा या राज्यातील संघांसह मुंबई,पुणे, छत्रपती संभाजी नगर व नाशिक येथील प्रतिष्ठित संघ सहभागी होतील सर्व सामने नाॅक आऊट पद्धतीने खेळविले जातील. स्पर्धा यशस्वीतेसाठी राजाभाऊ सोनवणे, झीशान खान,जमील सय्यद,शिनू जोस आदीसह कार्यकारणीचे अध्यक्ष मनीष चावला, उपाध्यक्ष सुशील चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन साळवे, सचिव मनोज गायकवाड, खजिनदार कुणाल धिवरे, सलीम खान,तरुण पंजाबी व फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहे.
