नाशिकचे राजकारण

ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना पक्षातून हकालपट्टी … ?

अजित पवार गटाचे उमेदवार कोकाटे यांच्या विजयासाठी प्रयत्न केला असल्याचा आरोप


वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर : दि. ८ फेब्रुवारी २०२५ — गद्दार म्हणून ज्याची ओळख सर्वदूर पसरली अशा उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची पक्षातुन त्वरित हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कारण त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. प्रादेशिक पातळीवर मी किती एकनिष्ठ आहेत हे दाखल्यांचे आणि स्थानिक पातळीवर पक्षाच्या विरोधात काम करणारे खासदार राजाभाऊ वाजे हे एक निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आव आणत आहे परंतु तालुक्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते. पदाधिकारी व मतदार हे सर्व ओळखून आहे. त्यामुळे सर्वसामान्य समाजाशी गद्दारी करणारे वाजे यांना पक्षात राहण्याचा कुठल्याही अधिकार नाही असे स्वराज्य पक्षाचे पराभूत उमेदवार शरद शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले , श्री , वाजे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे ठाकरे गटाचे निष्ठावान कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणात गोची झाली आहे , त्यामुळे सर्वसामान्य समाजाची मानसिकता बदलली . त्यामुळे श्री.वाजे यांच्या विरोधात ताबडतोब पक्षाच्या वतीने कार्यवाही करण्यात यावी , अशी मागणी संघर्ष समिती चे अध्यक्ष शरद शिंदे यांनी केली आहे,

        ”  विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी व कार्यकर्ते मध्ये जो गैरसमज आहे तो दुर करवा, कारण वाजे यांच्या घराण्यातील एकनिष्ठता, प्रामाणिक राहून राजकारण व समाजकारण करताना तालुक्यातील छोट्या वर्गात असलेल्या संबंध हिच खरी ओळख आहे ती कायम राखली जाईल असे मत ज्येष्ठ नागरिक जाणकार सांगतात,  “

.      ……      वरती एकनिष्ठ दाखवायचे मतदार संघात गद्दारी…………
बघा उबाठा शिवसेनेचे एकनिष्ठ खासदार आदरणीय राजाभाऊ यांचीं निष्ठा व गद्दारी. खासदार उबाठाचे विधानसभेला मदत,प्रचार भाजप ,एकनाथ शिंदे गट शिवसेना, अजितदादा गट राष्ट्रवादी उमेदवार माणिकराव कोकाटे यांना.खा.वाजे यांची आदरणीय उध्वजी ठाकरे यांनी हकालपट्टी केली पाहिजे. वर एक खाली एक यामुळे जनतेत गैरसमज होतो पक्ष व नेतृत्व याबाबत.
चुकीचा गैरसमज पसरत आहे .मिडिया व जनतेचा.चेहरा भोळाबाभडा परंतु श्रीमंत व कपटी राजकारणी आहेत.वाजेभाऊ खासदार उबाठाचे परंतु विधानसभेला प्रचार केला भाजप शिंदे गट,अजितदादा गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कोकाटेंचा.सरळ गद्दारी केली.वरती उध्वजी ठाकरे, शिंदे गट शिवसेना व भाजपला पाण्यात पहाता मग हे काय?उबाठा व शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोध प्रचार केला. तर उधवजी ठाकरे काय करताय?सरळ हकालपट्टी केली पाहिजे वाजेंची.११कोटी वंजारी समाजाने खासदारकीला वर्गणी दिली होती इतर वेगळी. निवडणुकीत खर्च केला नाही. मग पैसे कुठे गेले?हे चेहरा गरिबीचा परंतु प्रचंड श्रीमंत व कपटी राजकारणी आहेत.
वाजे यांच्यावर कारवाई केली पाहिजे आदरणीय उध्वजी ठाकरे यांनी अशी मागणी शरद शिंदेपाटील व सिन्नरकर जनतेची,कट्टर शिवसैनिक यांनी केली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!