‘ पोलीस आपल्या दारी ‘उपक्रमातून जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी

वेगवान नाशिक /Wegwan Nashik :- विशेष प्रतिनिधी, ५ फेब्रुवारी :
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागासाठी 100 दिवसाचा कृती आराखडाच्या अंमलबजावणी करणे बाबत आदेश झाले आहेत. त्याअनुषंगाने मा. पोलीस आयुक्त सो.नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ‘पोलीस आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जूने बस स्थानक येथे दि. 05/02/2025 रोजी वेळ 12:00 ते 12:40 वाजे पावेतो देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व पो. स्टे. कडील अधिकारी व अंमलदार यांनी जनतेच्या तक्रारीचे निवारण बाबत बैठक आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये नागरिकांशी संवाद साधून नागरिकांचे अडी अडचणी व तक्रारबाबत निवारण करण्यात आले असून सदर बैठक दरम्यान परिसरातील व्यावसायिक वाजिद सय्यद, सुनील गुप्ता, बांधकाम व्यवसायिक संदीप शिंदे, या क्षेत्रातील शिनू जोश, सामाजिक कार्यकर्ते मनोज गायकवाड सोनू रामवानी, नितीन साळवे, राहुल मोजाड, कुणाल धीवरे, अमित गावंडे, विजय गव्हाणे आदींसह विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी व शिवजन्मोत्सव समितीचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते. समारोप प्रसंगी नागरिकांच्या वतीने हा उपक्रम राबवल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व अंमलदार अनिल पवार यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.
