महाराष्ट्रातील हे संत पट्टा अभिषेक करत बनले ‘जगद्गुरु ”
श्री शंभू पंचरत्न जुना आखाड्याच्या वतीने पदवी प्रदान

वेगवान नाशिक/Wegwan Nashik:-
विशेष प्रतिनिधी,दि.३ फेब्रुवारी –
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान राष्ट्रसंत जगद्गुरु निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना काल वसंत पंचमीच्या निमित्ताने झालेल्या शाही स्थानादरम्यान जगद्गुरु पदवी बाल करण्यात आले असून यामुळे त्यांच्या भक्त परिवारामध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना काल रविवार दि.२ रोजी प्रयागराज येथे सर्व संत साधूंच्या उपस्थितीत श्री शंभू पंचदशनाम जुना अखाडा सर्व गुरुमुर्तींच्या प्रेरणेने व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जुनापिठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर अंनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘जगद्गुरु’ जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा जगद्गुरु पदाचा पट्टाभिषेक सोहळा संपन्न झाला. बालपणापासूनच ब्रह्मचारी असलेले शांतिगिरी महाराज हे सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सानिध्यात वाढलेले आहे त्यांनी आजतागायत देशभरामध्ये विविध धर्मसंस्कार सोहळे पार पाडले असून अनेकांना व्यसनमुक्त केले आहे. त्याचबरोबर काही धर्मांतर केलेल्या नागरिकांना देखील परत हिंदू धर्मात घेतले आहे. यामुळे देशभरात त्यांचा मोठा भक्त परिवार निर्माण झाला आहे तसेच छत्रपती संभाजी नगर वेरूळ आश्रमातून हजारो बालक व युवकांवर धर्मसंस्कार करण्याचे कार्य सुरू आहे.
