नाशिक ग्रामीण

मोहरी घाटात बिबट्याचा मृत्यू… अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे घटना

वनाधिकारी श्रीमती कांगणे मॅडम यांच्याकडून दखल


वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर  : दि , ३ फेब्रुवारी  — २०२४
सिन्नर — तालुक्यातील मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या चा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली असुन वनाधिकारी श्रीमती कांगणे मॅडम विषेश लक्ष दिल्याचे समजते परंतु बिबट्या चा जागीच मृत्यू झाल्यानं ते बिबट्या चा जिव वाचवु शकले नाही.कारण वाहनांचा बिबट्यास जबर धक्का बसला होता व त्याचा जागीच गतप्राण झाला आहे त्यामुळे तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे. सध्या तालुक्यातील सर्व च भागात बिबट्या चा वावर जास्त प्रमाणात वाढल्याने अनेक दिवसांपासून तालुक्यातील पुर्व भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या पुर्वी बर्याच ठिकाणी प्राणघातक हल्ला करून अनेक जणांना जिव गमवावा लागला असल्याचे घटना घडल्या आहेत हे टाळण्यासाठी संबंधित विभागाने या खास उपाय योजना करण्याची गरज आहे असे मतं मनसे शहरं अध्यक्ष गणेश मुत्रक यांनी व्यक्त केले आहे.

सिन्नर मोहदरी घाटात अज्ञात वाहनाने धडकेत बिबटया जागीच मृत झाला वनअधीकारी कांगणे मॅडम यांना घटनेची माहिती देताच अर्धातासात गस्ती वाहन घटनास्थळी आले त्या बिबट्यास डोक्यास मार लागल्या मुळे जागीच मृत्यू झाला  नंतर या बिबट्याला मोहदरी वन उद्यान सिन्नर येथे नेण्यात आले ,

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!