नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात पती -पत्नी जागीच ठार
नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात पती -पत्नी जागीच ठार

वेगवान नाशिक / मारुती जगधने
नांदगाव, ता. 30 – नांदगाव ते चाळीसगाव नॅशनल हायवे मार्गावर पिंपरखेड टोल नाक्या नजीक चार चाकी कार आणि मोटरसायकल या दोघांमधील अपघातामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.
या घटनेत अजून तीन जण गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात भाऊसाहेब माळी व लंकाबाई माळी राहणार नाग्या साक्या तालुका नांदगाव या पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात इतका भयंकर होता की अपघातात दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली अपघातात कारमधील प्रवासी सुद्धा गंभीर जखमी झाले आहे.
घटनेमध्ये कारचे नुकसान देखील झालेले आहे आणि मोटरसायकल सुद्धा चेंदामेंदा झालाय प्राथमिक माहितीनुसार दोन्ही वाहने जोरात वेगाने धावत असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते.
स्थानिक नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले याच दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी व जखमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
नांदगाव चाळीसगाव नॅशनल हायवे चांगल्या स्थितीत असल्याने रस्त्यावर वाहने वेगाने धावत असतात याच दरम्यान दोन्ही वाहनांच्या वेग मर्यादा ओलांडल्या गेल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
