नाशिकमध्ये अजून एक पिस्तोल बाळगणारा ताब्यात

वेगवान नाशिक / Wegwan Nashik –
विशेष प्रतिनिधी, 30 जानेवारी :-
मा.पोलीस आयुक्त संदिप कर्णिक साो, मा. प्रशांत बच्छाव साो. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे विशा),मा.सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सो (गुन्हे) यांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत, त्यानुसार आज दिनांक.२९/ ०१/ २०२५ रोजी उपनगर, नाशिकरोड भागात पेट्रोलिंग करत असतांना पोहवा/ नितिन फुलमाळी व पोअंम|संजय पोटीदे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीन्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक|/ श्री. विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनान्वये मोतीराम आढाव चौक,वैभव लक्ष्मी लॉन्स व बॅक्वेट हॉलवे समोर मोकळयाजागी, उपनगर नाशिक येथे एक इसम हा त्याचे कब्जात एक विनापरवाना घातक पिस्तोल ( अग्निशस्त्र ) व १ जिवंत राउंड (काडतुस) जवळ बाळ्गुन आहे. त्यास सदर ठिकाणी सपोउनि बाळु शेळके,शंकर काळे,विलास गांगुरडे,पोहवा नितिन फुलमाळी व पोअंम.संजय पोटीदे अशांनी सापळा रचुन त्यास थशिताफिने ताब्यात घेतले असता त्यांस त्याचे नांव विचारता त्याने त्याचे नांव युवराज अनिल निकम,वय-२४ वर्ष,रा.कोणार्कनगर,बालाजी चौक ,शिक्षक कॉलनी, आंडगांव नाशिक असे सांगितले असता त्याचे कब्जातुन २९,९००/- रू किंमतीचा देशी बनावटीचे विनापराना एक घातक पिस्तोल (अग्नीशस्त्र) व १ निवंत राउंड (काडतुस) मिळून आल्याने त्यास पंचनामा कारवाई करून जप्त मुदेमालासह ताब्यात घेऊन उपनगर पो.ठाणे येथे वर्ग केले आहे.
सदरची कामगीरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ.समाधान हिरे व गुन्हेशाखा युनिट २ कडील सपोउनि बाळु शेळके, शंकर काळे,विलास गांगुडे, गुलाब सोनार, पोहवा नंदकुमार नांदर्डीकर, नितीन फुलमाळी,प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी,प्रकाश महाजन,वाल्मीक चव्हाण,सुनिल खैरनार,पोअंम/ संजय पोटीदे,प्रविण वानखेडे अशांनी केलेली आहे.
