
वेगवान नाशिक/Wegwan Nashik-
विशेष प्रतिनिधी 30 जानेवारी :-
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) नाशिक रोड यांनी माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून एक लावारिस नाबालिग मुलगी सुरक्षितपणे चाइल्ड हेल्पलाइनकडे सुपूर्द केली.
दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर सहायक उपनिरीक्षक श्री दिनेश यादव व महिला प्रधान आरक्षक श्रीमती सरिता मोरे गस्त घालत असताना एक नाबालिग मुलगी एकटी व लावारिस स्थितीत फिरताना दिसली. तिची परिस्थिती पाहून आरपीएफच्या पथकाने तिला सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने तिला विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणतीही स्पष्ट माहिती देऊ शकत नव्हती.
यानंतर, आरपीएफने रेल्वे चाइल्ड लाइन शी संपर्क साधून माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी मुलीला आरपीएफ कार्यालयात नेले व तेथे चाइल्ड लाइनच्या प्रतिनिधी सुर्वणा वाघ व त्यांच्या टीमने तिची चौकशी केली. या चौकशीदरम्यान तिने आपले नाव अलफिया परवीन शेख अलताफ (वय- 14 वर्षे) सांगितले. तसेच आपल्या वडिलांचे नाव परवीन शेख अलताफ आणि मुळगाव हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्र असल्याची माहिती दिली.
आरपीएफ आणि चाइल्ड लाइनच्या पथकाने संवेदनशीलता लक्षात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी करून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिला बालकल्याण समिती, नाशिक येथे सुपूर्द केले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या या तातडीच्या व जबाबदार कृतीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेची व कल्याणाची त्यांची बांधिलकी अधोरेखित होते. रेल्वे सुरक्षा दल सर्व प्रवाशांना आवाहन करते की, रेल्वे स्थानक परिसरात कोणीही लावारिस अथवा संकटात असलेले मूल आढळल्यास त्वरित आरपीएफ किंवा चाइल्ड हेल्पलाइनला कळवावे.
