नाशिक क्राईम

नाशिकमध्ये येथे सापडले २ गावठी पिस्टलसह ८ जिवंत काडतुस

क्राईम युनिट दोन च्या पथकाकडून एक इसम ताब्यात


वेगवान नाशिक/Wegwan Nashik-

२९ जानेवारी, विशेष प्रतिनिधी –

मा.पोलीस आयुक्त संदिप कर्णिक साो,यांनी नाशिक शहरातील अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यांवर कायेवाही करण्याबाबत गुन्हेशाखेस सुचना कल्या होत्या,मा.प्रशांत बच्छाव साो. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे|/ विशा), मा.सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके सो(गुन्हे) यांच्या मार्दर्शनाखाली, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार तसेच सपोनि डॉ.समाधान हिरे यांच्या पथकाने दि.२९/०१/ २०२५ रोजी श्रेणी पो. उपनिरी.मुक्तारखान पठाण यांना मिळालेल्या गोपनिय माहितीन्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री विद्यासागर श्रीमनवार तसेच सपोनि डॉ.समाधान हिरे यांचे मार्गदर्शनानुसार पाथर्डी फाटा,जगन्नाथ चौकाजवळील समर्थनगरमधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये राहणारा धुपकरण चौधरी नावा्या इसमाच्या हयुंडाई सँन्द्रो कार गाडीमध्ये घातक अग्नीशस्र असल्याची बातमी मिळाली होती. सदर टिकाणी सापळा रचुन संशयीत इसम नामे धुपकरण रामलगन चौधरी सध्या रा.फ्लॅट नंबर ०९/ प्रथमेश अपार्टमेंट, तिसरा मजला, समर्थनगर जगन्नाथ चौक, इंदिरानगर, नाशिक.मुळ राहणार- अहिरौला, ता- भानपुर पोस्ट- आगारे डिहा, जिल्हा- बस्ती , रान्य -उत्तर प्रदेश. यास ताब्यात घेवुन त्याचे पांढऱ्या रंगाची हयुंडाई सँट्रो कार MIH-04 CZ-0725 हिचेत त्याने ठेवलेले १ लाख ५८ हजार रू किंमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे दोन घातक पिस्तुल (अग्नीशस्त्र) व ८ जिवंत राउंड व सदर १ लाख ५० हजार रू. किंमतीची सँट्रो कार असा एकुण ३ लाख ८ हजार रू किंमतीच्या एकुण मुद्देमालासह त्यास पंचासमक्ष पंचनामा कारवाई करून जप्त मुददेमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर इसमाविरुध्द इंदिरानगर पो.ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम ३(२५) अन्वये व महा.पो.का.कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे

सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे तसेच सपोनि डॉ.समाधान हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रं..२ कडील पो.उपनिरी. मुक्तारखान पठाण ,सहापोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे ,भारती देवकर, हवालदार नंदकुमार नांदुडीकर, गुलाब सोनार, सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन ,चंद्रकांत गवळी, सुनिल खैरनार यांनी केलेली आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!