
वेगवान नाशिक/Wegwan Nashik-
विशेष प्रतिनिधी, 27 जानेवारी –
गेल्या पाच दिवसापासून नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या रणजी सामन्यादरम्यान महाराष्ट्र संघाने 439 एवढ्या मोठ्या धावसंख्या उभारत विजय प्राप्त केला आहे. पाचही दिवस नाशिककरांनी मैदानावर हा सामना पाहण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली होती.
गुरुवारी सुरू झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी केली या सामन्यात प्रथम डावामध्ये 297 धावा करत प्रेक्षकांना आनंदी केली यामध्ये नासिक मधील ट्रंकवाला याने 33 चेंडू 22 धावा करत शानदार सुरुवात केली. तर आठव्या क्रमांकावर येत रामकृष्ण घोष यांनी 57 चेंडूत 26 धावा काढल्या क्रमांक तीन वर आलेला सिद्धेश वीर याने 88 चेंडूत 48 धावा केल्या तर सातव्या क्रमांकावर यष्टिरक्षक सौरभ नवले याने 152 चेंडूत 83 धावा केल्या. दरम्यान 98.4 षटकांमध्ये 297 एवढा धावा झाल्या होत्या.
यानंतर फलंदाजी झालेल्या बडोदा संघ 145 धावांमध्येच गार झाला दुसरा दावा दरम्यान महाराष्ट्राच्या संघाने उत्तम खेळ सादर केला यामध्ये कर्णधार गायकवाड यांनी 83 चेंडू 89 धावा तर नवले याने 200 चेंडूत 126 नासिककर राहुल घोषने 134 चेंडूत 99 धावा केल्या. चौथ्या दिवशी महाराष्ट्र संघाने 7 बाद 464 या धावसंख्येवर डाव घोषित करून बडोदा संघासमोर 617 धावांचे आव्हान ठेवले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना 177 धावांमध्ये बडोदा संघ तंबूत परतला या खेळात महाराष्ट्र संघातील चौधरीने 76 धावा 5 बळी ने 54 धावा 3 बळी तर रामकृष्ण घोष याने 23 धावात दोन बळी घेतले यामुळे महाराष्ट्र संघाला 439 एवढ्या धावांनी विजय मिळाला.
नव्या वर्षातला हा पहिलाच सामना नाशिककरांना उत्तम खेळाची दाखवून देऊन गेला यासाठी विनोद शहा समीर रकटे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कमिटीचे सर्व सदस्य कर्मचारी वर्ग हे प्रयत्नशील होते.
महाराष्ट्र संघाच्या उत्कृष्ट खेळाने 126 धावा काढणारा सौरभ नवले यास सामनावीर पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाशिकचे हवामान खेळासाठी उत्तम असून मैदानही सुंदर साकारले होते प्रेक्षकांनी देखील या सामन्याचा उत्तम आनंद घेतला उत्तम व्यवस्था व प्रेक्षकांची साथ यामुळे हा दैदिप्तमान विजय नाशिककरांच्या कायम स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अनिल अध्यारू यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
