
वेगवान नाशिक/ मारुती जगधने
नांदगाव/ दिनांक 27 जानेवारी/ताराबाद, बागलाण तालुका, नाशिक जिल्ह्यातील एका वनमजुराने अंगावर ज्वलंत पदार्थ टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती
. तथापि, बागलाण तालुक्यातील नामपूर भागात, दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या शेतमजूर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ही घटना ताजी असतानाच ताराबाद तालुका सटाणा येथील वन मजूर राजेंद्र साळुंखे यांनी अंगावरती डिझेल सारखे ज्वलंत पदार्थ घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात 80 टक्के भाजला त्या सध्या उपचार दिले जात आहे.
साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापुर्वी साळुंखे यांनी एक अधिकाऱ्याच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या मुर्दाबाद अशा घोषणा देत स्वतः च्या अंगावर डिझेल ओतून घेऊन आगपेटीची काडीने पेटवून घेतले घडलेला प्रकार पाहून उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ राजेंद्र साळुंखे यांच्या अंगावर पाणी टाकून व सुती कापड टाकून त्यांच्या कपड्याची आग विझवून त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
एकावन बालाच्या विरोधात साळुंखे यांनी घोषणा दिल्याचे समजते यात घटनेत साळुंखे 80 टक्के भाजला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.साळुंखे गेल्या पंचवीस वर्षांपासून वन मजूर म्हणून काम करत आहे मात्र इतके वर्षे उलटून देखील त्याला नोकरीत कायम न करण्यात आल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असून आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या संबंधी विचार येत असल्यास, कृपया त्वरित मदत घ्या. भारतामध्ये, आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन उपलब्ध आहेत, जसे की ‘समाज सेवा’ हेल्पलाईन क्रमांक 9152987821. तसेच, आपल्या जवळच्या मानसिक आरोग्य तज्ञ, कुटुंबीय किंवा मित्रांशी बोलणेही उपयुक्त ठरू शकते.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये