छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का?
छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का?

वेगवान नाशिक/ एकनाथ भालेराव
नाशिक /दिनांक: 25जानेवारी 2024/केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा नुकतेच नाशिकच्या मालेगाव येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना बोलावून शेजारच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. यावेळी दोघांनी काहीकाळ संवादही साधला. अमित शाह यांच्या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
अमित शाह यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले, अमित शाह
साहेबांचा मोठेपणा आहे की त्यांनी मी लांब बसलेलं असताना मला आपल्या जवळ बोलावून खुर्चीवर बसवलं. तीन वर्षांपूर्वी येथील लोक माझ्याकडे आले, त्यावेळेस मला विश्वास नव्हता की, असे होऊ शकते. असे मी त्यांना सांगितले. त्यावेळी अमित शाह यांनी म्हटले की, या लोकांनी खरोखर किमया करून दाखवली आहे. याबाबत आमची चर्चा झाली. आमची राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही.
तुम्ही, आम्ही दिल्लीत कधीही जाऊ शकतो ते मला म्हणत होते की, तुम्ही भाषण करा मग मी त्यांना
सांगितलं की, तुम्ही येण्याच्या अगोदरच मी भाषण केलं आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. अमित शाह यांनी तुम्हाला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का? असे विचारले असता दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तुम्ही, आम्ही दिल्लीत कधीही जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यानंतर ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून आले आहे. अलीकडेच शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात छगन भुजबळ गेले होते. मात्र ते अवघ्या दोन तासात शिर्डीतील शिबिरातून माघारी परतले होते. यावेळी छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली होती. यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये