एक वधु वर मेळावा माझ्या मराठा समाजासाठी
समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या पुढाकाराने होणार मेळावा

वेगवान नाशिक/Wegwan Nashik- विशेष प्रतिनिधी- 24 जानेवारी
गेल्या काही वर्षांपासून तरुण-तरुणींना विवाह करण्याची मनापासून इच्छा असली तरी अनेक कारणांनी विवाह जुळत नसल्याने नाशिक मधील सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक प्रभाकरराव रायते यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड नाशिक दिंडोरी निफाड तालुक्यातील काही मान्यवरांच्या सहकार्याने ‘एक मेळावा माझ्या मराठा समाजासाठी ‘ याद्वारे मराठा वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
येत्या आठ दिवसानंतर पुढील महिन्यातील पहिला रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता हरीकृपा मंगल कार्यालय लॉन्स पाटाजवळ म्हसरुळ दिंडोरी रोड नाशिक येथे ९६ कुळी मराठा शेतकरी नोकरदार व्यावसायिक उपवर तसेच घटस्फोटीत विधूर विधवा वधुवर आणि पालक मेळावा मोफत आयोजित करण्यात आला आहे आपण आपापल्या भाऊबंदकीच्या, गावाच्या ग्रुपमध्ये या मेळाव्या बाबत असलेली ही बातमी पाठवून सहकार्य करावे या मेळाव्यासाठी आपण समाजकार्य समजून आपल्या भाऊबंदकीतल्या अशा मुला मुलींच्या पालकांशी स्वतः संपर्क करून त्यांना प्रोत्साहित करावे. जेणेकरून विवाह जुळविणे शक्य होईल.
सदर मेळाव्यास जिल्हाभरातून निर्व्यसनी, सुशिक्षित, प्रगतिशील सधन शेतकरी नोकरदार व्यावसायिक मुले मुली उपस्थित राहणार आहे. त्यांच्याशी सोयरीक करून मुलींच्या आयुष्याचे कल्याण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यास हातभार लावावा ही कळकळीची नम्र विनंती.
■ मेळाव्याचे ठिकाण -हरीकृपा मंगल कार्यालय लॉन्स पाटाजवळ म्हसरुळ दिंडोरी रोड नाशिक.
■ मेळाव्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ राहील.
🔹मराठा समाजातील सामाजिक कार्य म्हणून विवाह जमविणारे समाजसेवक यांनी आवर्जुन उपस्थित रहावे.
■ सदर मेळाव्या करीता येतांना आपल्या मुला मुलींचा बायोडाटा दोन प्रती तसेच सुसंस्कृत फोटो कॉपी सोबत आणावी.
■ पालकांना सोबत आणावे.
■ मुला मुलींनी मेळाव्याच्या ठिकाणी एक तास अगोदर येऊन नोंदणी करावी मेळावा विनामुल्य आहे.
■ मेळाव्यास येणाऱ्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
🙏 संपर्क –
श्री प्रभाकरराव रायते साहेब (सेवानिवृत DYSP )
शिंगवे.नाशिक. मो. नं.9049988013
श्री दिलीपकुमार कावळे
बोपेगांव ता दिंडोरी. 9423083878 / 8668441806
श्री विलास राजाराम शिंदे
(वडनेर भैरव ) 9970246077
