नाशिकमध्ये येथे होणार यांत्रिक झाडूने स्वच्छता
कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतले अत्याधुनिक रोड स्वीपर मशी
वेगवान नाशिक/Wegwan नाशिक
विशेष प्रतिनिधी, दि. 20 जानेवारी
शहरातील रस्त्यांची स्वच्छता अधिक जलद व प्रभावीपणे करण्यासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट ने स्वच्छ सर्वेक्षण व कचरा मुक्त शहर (GFC) या अनुषंगाने अत्याधुनिक रोड स्वीपर मशीन स्वच्छतेसाठी उपलब्ध केली आहे. या मशीनमुळे स्वच्छतेच्या कामात मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे.या मशीनला स्वयंचलित प्रणाली, धूळ आणि कचरा वेचण्याची प्रगत क्षमता, कमी वेळेत अधिक क्षेत्र स्वच्छ करण्याची क्षमता.या मुळे वेळेची बचत, कामगारांचे श्रम कमी होणे, शहर स्वच्छतेच्या कामात गती वाढण्यास मदत होईल.याचा उपयोग शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, तसेच वर्दळीच्या भागांमध्ये करण्यात येणार आहे.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य प्रीतम आढाव, कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड, आरोग्य अधिक्षक अमन गुप्ता, डॉ मनिषा होनराव, पाणीपुरवठा विभाग अभियंता स्वप्निल क्षत्रिय, बांधकाम अभियंता पियूष पाटील, आरोग्य निरिक्षक मयूर सोधे, शुभम शेंडगे आदींच्या उपस्थितीत या मशीनचे लोकार्पण सोमवार दिनांक २० जानेवारी रोजी बोर्ड बैठकीनंतर करण्यात आले.
यावेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, “शहर स्वच्छ ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाचा हा उपक्रम परिसराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वाचा ठरेल, तसेच भविष्यात आणखी अशा प्रगत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले. ही आधुनिक मशीन स्वच्छता व्यवस्थापनाला नव्या उंचीवर नेईल, असा विश्वास देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अधिक्षक अमन गुप्ता यांनी व्यक्त केला.