या महिला आमदार करताय उपचारादरम्यान थेट दवाखान्यातून कामकाज
देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोजा हिरे

वेगवान नाशिक/Wegwan Nashik :-
विशेष प्रतिनिधी, १३ जानेवारी –
देवळाली मतदार संघाच्या कार्यशील आमदार या गेल्या आठवड्याभरापासून खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांनी थेट दवाखान्यातूनच आपले कामकाज सुरू केल्याचा फोटो पोस्ट आपल्या सोशल मीडिया हँडलरवर पोस्ट केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आमदार सरोज अहिरे या पायाला भिंगरी बांधून प्रचारासाठी दिवस-रात्र एक करत होत्या. निवडणूक जिंकल्यानंतर शपथविधी व सरकार स्थापने दरम्यान काही दिवस गेले. त्यानंतर त्यांनी गेल्या महिन्याभरात कुटुंबासमवेत देवदर्शनही केले. तेथून आल्यानंतर जिल्हाभरातील वारकऱ्यांसमवेत संत पूजन व संत भोजन पार पाडले. या दरम्यान दररोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे त्यांची प्रकृती काहीशी गेल्या आठवड्यात त्यांना उपचारासाठी नाशिक रोड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारास विलंब होत असल्याने आमदार सरोज अहिरे यांनी आता थेट दवाखान्यातून कामकाज सुरू केले असल्याची पोस्ट करत याबाबत मतदार संघातील नागरिकांना सुचित केले आहे.
मतदारांना हा दिला संदेश
मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने नागरीकांना मी प्रत्यक्ष भेटू शकलेली नाही, परंतु जनहिताचे कोणतेही काम थांबलेले नसुन दैनंदिन कामकाज देखील आपल्या संपर्क कार्यालयातून सूरू आहे. नागरीकांना काही अडचण आल्यास ०२५३- २४७३१११ या क्रमांकावर संपर्क साधावा. आपल्या सर्वांचे आशीर्वाद व डॉक्टरांचे योग्य उपचार यामुळे मी लवकरच बरी होऊन आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल. सर्व शुभचिंतकांचे मनापासुन आभार.
