नाशिक क्राईम

हरसुल व त्र्यंबकेश्वर हद्दीत लुटमारीसह घरफोडया करणारी टोळीस अटक

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


 

वेगवान नाशिक/Wegwan Nashik –

 विशेष प्रतिनिधी  दि. १३ जानेवारी –

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दि.२९ नोव्हेंबर रोजी रात्रीे सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे गावचे शिवारातील रहिवासी भगवान महाले यांचे घरामध्ये अज्ञात आरोपीनी संमतीशिवाय प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ५,२३,१७४/- रू. किं.वा मुद्देमाल चोरी करुन चोरून नेला होता, सदर बाबत त्र्यंबकेश्वर पो.स्टे. गुरनं २१०/ २०२४ आ.न्या.सं. कलम ३०९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल होता. तसेच वरील घटनेनंतर हरसुल पोलीस ठाणे हद्दीत दि. १५/ १२/ २०२४ रोजी मध्यरात्रीवे सुमारास आरोपीतांनी वाघेरा शिवारातील रहिवासी अजय धोंगडे यांचे घराचा दरवाजा तोडुन घरामध्ये संमतीशिवाय प्रवेश करून त्यांना व त्यांची आई यांना कोयता व सु-याचा धाक दाखवुन, आरडाओरड केल्यास मारून टाकु असा दम देवुन अंगावरील व घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने मोबाईल फोन असा एकुण २६,’९००/- रू. किं.वा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला म्हणुन हरसुल पो.स्टे. गुरनं २६७ २०२४ भा.न्या.सं कलम ३०९(४), ३३१(६), ३५१(३), ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्हयातील ना उघड मालाविरूध्दचे गुन्हयांचा आढावा घेवुन, गुन्हे उघडकीस आण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशावे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने वरील दोन्ही गुन्हयांमधील अज्ञात आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत व त्यांनी परिधान केलेले कपडे तसेच बोलीभाषा यावरून सदर आरोपी हे नाशिक शहर परिसरातीलच असल्याचा तर्क लावुन तपास सुरू केला. त्याप्रमाणे खब-यांमार्फत गुप्त माहिती घेवुन नाशिक शहरातील चुंचाळे, अंबड व गंगापुर परिसरातुन खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

१) आदित्य एकनाथ सोनवणे, वय २५, रा. समशेरपुर, ता.अकोले, जि.अहिल्यानगर, हल्ली रा. अंबड, नाशिक

२) किरण अविनाश जाधव, वय र

२३, रा. जाधव संकुल, अंबडलिंक रोड, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक

३) गोपाळ मधुकर उघडे, वय २९, रा.. वेळुंजे, ता.तरबकेश्वर, जि.नाशिक

४) सनी संनय कटारे, वय २१, रा. गंगापुर गाव, ता.जि.नाशिक

५) विधीसंघर्षित, रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक ताब्यात घेतलेले वरील आरोपींना। विश्वासात घेवुन सदर गुन्हयांबाबत चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार नामे ६) अजय प्रसाद, रा. जाधव संकुल, अंबड, नाशिक याचेसह मागील दोन महिन्यांमध्ये एर्टिगा कार भाडेतत्वावर ठरवून त्र्यंबकेश्वर व हरसुल परिसरात जावुन वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीचे कब्जातुन वरील गुन्हयांतील चोरीस गेलेल्या रकमेंपैकी १७ हजार रु.रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले वरील आरोपीना हरसुल पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे. यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी नाशिक शहर, नाशिक ग्रामीणव अहिल्यानगर जिल्हयामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आर्म ऑक्ट, दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे  गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांनी कबुली दिल्यावरून घरफोडी व जबरीचोरी असे एकुण ०२ गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे , सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे पोलीस अंमलदार संदिप नागपुरे, विनोद टिळे, किशोर खराटे हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, प्रविण गांगुर्डे सतिष जगताप, योगेश पाटील, सविन देसले, बापु पारखे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन वरील गुन्हे उघडकीस आणलेले आहे.

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!